राखीव भूखंडावरच ट्रक टर्मिनल विकसित करण्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठकीत भूमिका; ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेले भूखंड बदलले तर वाहतूकदारांचा विरोध:- राजेंद्र फड…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक) :-नाशिक औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनल विकसित करण्याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी आहे. याबाबत आज प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राखीव भूखंडावरच ट्रक टर्मिनल विकसित करण्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेले भूखंड बदलले तर वाहतूकदारांचा विरोध राहील अशी स्पष्ट भूमिका अध्यक्ष राजेंद्र फड यांनी बैठकीत मांडली.
यावेळी आमदार सीमाताई हिरे, प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, आयमा संघटनेचे अध्यक्ष वरून तलवार,धनंजय बेळे व कार्यकारी अभियंता यांच्यासह नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सल्लागार प्रदीप जोहर,सेक्रेटरी शंकरराव धनावडे उपस्थित होते.
यावेळी आयमा संघटनेच्या वतीने औद्योगिक वसाहतीच्या बाहेरील जागेत ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे अशी भूमिका मांडली. या भूमिकेला नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने विरोध करण्यात आला आहे.औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनल हे वसाहतीच्या मध्यवर्ती ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानुसार भूखंड राखीव करण्यात आलेला आहे. राखीव भूखंडाला लगत दोन मोठे रस्ते असून दोनीही बाजूने जाण्यायेण्याची व्यवस्था आहे. आवश्यक त्या सर्व सुविधा या याठिकाणी होऊ शकता. राखीव ठेवलेला भूखंड बदलले तर वाहतूक दारांचा याला विरोध राहील. त्या राखीव भूखंडावर ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे अशी स्पष्ट भूमिका
राजेंद्र फड यांनी यावेळी मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *