कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- नाभिक समाजाला ऐतिहासीक वारसा असून या समाजाचे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून नाभिक समाजाचे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव तालुका नाभिक समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी नाभिक समाजाला सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लक्ष रुपये निधी दिल्याबद्दल नाभिक समाजाच्या वतीने आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, किरण बिडवे, सोमनाथ व्यवहारे, दिलीप जाधव, गोरक्षनाथ वैद्य, मनोज बिडवे, सचिन वैद्य, गणेश बिडवे, सुमित बिडवे, मुकुंद जाधव, गोपीनाथ जाधव, शेखर निकम, कचेश्वर कदम आदींसह नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब, माजी आमदार अशोकराव काळे व सौ. पुष्पाताई काळे यांनी नेहमीच नाभिक समाजाला मदत केली असून हा समाज काळे परिवाराशी जोडला गेला आहे. जीवघेण्या कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नाभिक बांधवांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.अनेक दिवस व्यवसाय बंद असल्यामुळे नाभिक समाजाचे अर्थचक्र बिघडल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याची मला जाणीव असून महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

फोटो ओळ – आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करतांना नाभिक समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव.
