

कोपरगांव प्रतिनिधी:- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून ना.नारायण राणे यांच्यावर कारवाई झाली होती, त्याचप्रमाणे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मारण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोले यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे. आता मात्र सावरासावर करतांना नाना पटोले म्हणतात कि, मी पंतप्रधान मोदीजी यांच्याबद्दल बोललेलो नसून मोदी नांवाच्या एका गुंडांबद्दल बोललो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पायाजवळही उभे रहायची पात्रता नसणारे दलबदलू नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अपशब्द वापरूनही कारवाई होणार नसेल तर मीही म्हणू शकतो कि, नाना पटोले नावाच्या गुंडाच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे. राहुल गांधी व त्यांचे भंपक अनुयायी प्रसिद्धीच्या नादात देशाच्या पंतप्रधानांचा वारंवार अवमान करत आहेत. असे होऊनही त्याच काँग्रेसचे काही पोरकट गावगन्ना पुढारी पटोलेचेच समर्थन करतील हेही जनतेला माहित आहे. कालच भारतीय जनता पार्टी (वसंतस्मृती) कार्यालय च्यावतीने मे.पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन नाना पटोले विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
