कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष श्रीपतराव गवळी यांचे निधन…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष व मढ़ी खुर्द सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्रीपतराव तात्याबा गवळी वय ८१ यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, एक भाउ, सुना नातवंडे असा परिवार आहे. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संजय गवळी यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थीवावर मढी खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले. कै. श्रीपतराव गवळी हे गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघात पाच वर्षे उपाध्यक्ष, तर सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांत १९८४ ते १९८९, २००६ ते २०११ तर २०११ ते २०१६ या काळात संचालक होते. २००२ ते २००४ या काळात त्यांनी कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्षपद भूषविले. संजीवनी एज्युकेशन सोसायटी तसेच संजीवनी ट्रस्ट अंतर्गत संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल येथेही ते कार्यरत होते, अत्यंत मनमिळावू आणि विश्वासू म्हणून ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या निधनाबददल माजीमंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयूटचे मॅनेजींग ट्रस्टी अमित कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, सर्व आजी माजी संचालक आदिंनी शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *