
कोपरगाव प्रतिनिधी (धुळे):-“ गेल्या दहा – बारा वर्षात रोहा , पिंपरी – चिंचवड , औरंगाबाद , शेगांव , नांदेड येथे झालेली अधिवेशनं ही पत्रकार चळवळीस बळकटी देणारी ठरली असून मराठी पत्रकार परिषदेच्या परंपरेला साजेसेच अधिवेशन यंदा डिसेंबर मध्ये व्हावे असा प्रयत्न आहे . ‘ आमच्या जिल्ह्यात अधिवेशन घ्या ‘ अशी दोन – तीन जिल्ह्यांची मागणी असून लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल . साधारणत : आतापर्यंत ज्या भागात अधिवेशन झाले नाही तिकडे अधिवेशन व्हावे असा प्रयत्न असेल ” असे सुतोवाच अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी नुकतेच केले . राजेंद्र काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने ८२ वर्षांची परंपरा असलेल्या अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे ४१ वे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीरित्या शेगांव येथे पार पडले त्याला नुकतीच चार वर्ष पूर्ण झाली . शेगांव संस्थानचे कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील आणि संस्थानच्या सहकाऱ्यांमुळे जेथे २० ते २५ लाख रुपये खर्च अपेक्षित होता ते अधिवेशन अवघ्या पाच लाख रुपयात तेही हा निधी थेट त्या – त्या सहकाऱ्यांकडून संस्थानला देणगी स्वरुपात जमा झाला होता . त्यात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने शेगांव या संत नगरीत दोन हजार पत्रकारांची मांदीयाळी जमवून पत्रकारांना शेगाव संस्थान जवळून बघण्याची अनुभूती आली . पत्रकारांनी अगदी सहपरिवार ‘ आनंदसागर ‘ बघुन अनुभूती घेतली . प्रत्यक्ष कार्यक्रमात उपस्थित न राहता अधिवेशनासाठी ज्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले ते संस्थानचे कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे नुकतेच निधन झाले . त्यांची आठवण म्हणून राजेंद्र काळे यांनी त्यांच्या स्मृतिला उजाळा देत असतांना आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख म्हणाले , शेगावचे अधिवेशन ऐतिहासिक ठरले . कुठलाही वाद न होता बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि राजेंद्र काळे यांच्या टीमने घेतलेले परिश्रम मी विसरु शकत नाही . दोन हजार पत्रकारांनी संस्थानला अपेक्षित शिस्त पाळली आणि अनेक चांगल्या गोष्टींची शेगावात अनुभूती आली . नुकतेच निधन झालेले व अधिवेशनासाठी महत्वाचे योगदान असलेले कर्मयोगी शिवशंकर भाऊंची मला भेट घेता आली नाही अशी खंत व्यक्त केली . शिवशंकरभाऊंच्या प्रती एस.एम. देशमुख यांनी परिषदेच्या वतीने ऋण व्यक्त करीत भाऊंना श्रद्धांजली अर्पण केली.
