पर्यावरण रक्षणाची चळवळ गतिमान होणे गरजेचे:- प्राचार्य नूर शेख…

Uncategorized


कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- बेसूमार होत असलेल्या वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे अनियमित पर्जन्यमान, अतीउष्णता, महापूर अशा आपत्ती निर्माण होत आहे. हि अतिशय गंभीर बाब असून वेळीत निसर्गाचा बिघडलेला समतोल सावरला गेला नाही तर याचे गंभीर परिणाम पुढील पिढीला भोगावे लागतील. त्यासाठी पर्यावरण रक्षणाची चळवळ गतिमान होणे गरजेचे असल्याचे प्राचार्य नूर शेख यांनी म्हटले आहे.

कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम पब्लिक स्कूलमध्ये वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, दिवसेंदिवस पर्यावरणाची मोठ्या प्रमणात हानी होत त्यामुळे दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. निसर्गाचा बिघडलेला समतोल सावरून त्यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करण्याबरोबरच त्यांचे संवर्धन देखील तेवढेच महत्वाचे असून त्यामुळे निसर्गचक्र व्यवस्थित सुरू राहणार आहे. त्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन चळवळ हि काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गौतम पब्लिक स्कूलचे माध्यमिक व प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक, फिजिकल डायरेक्टर, शिक्षक –शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.

फोटो ओळ:- माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूल मध्ये करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *