शस्त्रक्रिया थांबल्या तेव्हा शिर्डी साईबाबा सुपरस्पेशलिटीचे कोवीड सेंटर साईनाथ हॉस्पिटल येथे हलवा:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना महामारी संसर्गावर उपचारासाठी श्री साईबाबांच्या शिर्डीत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये कोवीड सेंटर सुरू करण्यात आले, पण तातडीने करावयाच्या शस्त्रक्रिया पर्यायाने थांबल्या आहेत त्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत यासाठी हे कोवीड सेंटर साईनाथ हॉस्पिटल मध्ये हलवून श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयशस्त्रक्रिये सह अन्य तातडीच्यi शस्त्रक्रिया सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, अहमदनगरचे जिल्हाधिकारी व साईबाबा संस्थान यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, कोरोना उपचारासाठी संस्थांन अंतर्गत शिर्डी येथे कोवीड सेंटर उभारण्यात आले. गोरगरीब रुग्णांचा विविध शस्त्रक्रिया उपचार सुविधेसाठी श्री साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध आहे, मात्र सध्या कोविड सेंटरही याच इमारतीत सुरू असल्याने येथील छोट्या-मोठ्या सह तसेच गंभीर आजाराच्या व तातडीच्यi तसेच हृदयशस्त्रक्रिया यावर मोठा परिणाम झालेला आहे, या आजाराचे रुग्ण ताटकळत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असंख्य रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तारखा दिल्या आहेत, पण कोवीड सेंटरमुळे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियासाठी संबंधित डॉक्टरांना सुविधा निर्माण होण्यात अडचणी तयार झाल्या आहेत, परिणामी रुग्ण दगावण्याची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा सदरचे कोवीड सेंटर हे शेजारच्याच साईनाथ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात यावे. येथे प्राणवायू प्रकल्प असून अतिदक्षता खाटांची व्यवस्थाही उपलब्ध होऊ शकते म्हणजे यातून दोन्ही प्रकारच्या रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे तेव्हा संबंधितांनी व संस्थान व्यवस्थापनाने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी सौ स्नेहलता कोल्हे यांनी शेवटी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *