लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन..!

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
कोपरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार आशुतोष काळे संपर्क कार्यालय व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मित्रमंडळाच्या वतीने धारणगाव रोड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळकनगर येथे कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, फकीरमामु कुरेशी, रावसाहेब साठे, मुकुंद इंगळे, डॉ. तुषारजी गलांडे, अंबादास वडांगळे, संदीप कपिले, वाल्मीक लहिरे, धनंजय कहार, नारायण लांडगे, इम्तियाज अत्तार, जावेद शेख, राजेंद्र आभाळे, विजय त्रिभुवन, नितीन साबळे, चंद्रशेखर म्हस्के, उमेशज दीक्षित, सचिन खैरनार, गौतम खंडिझोड, प्रसाद उदावंत, चंद्रकांत धोत्रे, संदीप सावतडकर, योगेश नरोडे, माणिक जाधव, संपत चंदणशिव, राजेंद्र वैरागळ, बाळासाहेब पवार, पुंडलिक वायखिंडे, हर्षल जैस्वाल, प्रकाश दुशिंग, कैलास महालकर, किशोर डोखे, संतोष शेलार, राजु ठाकरे, रवींद्र चिंचपुरे, शंकर घोडेराव, हारूण शेख, राहुल राठोड, फकीरराव चंदनशिव, महेश उदावंत, विलास आव्हाड, संतोष बारसे, भाऊसाहेब लोहकरे, सुरेश मरसाळे, गौरव वाघ, रोहित चव्हाण, सौरभ यादव, संजय बागुल, प्रवीण शेलार, कालु चोपदार, राकेश शहा, राजेंद्र कांबळे, समाधान शिंदे, आकाश चंदनशिव आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ:-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *