
कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 28/7/2021 बुधवार रोजी महाराष्ट्र नव निर्माणS सेना कोपरगाव शहर व तालुक्याचे वतीने वीज वितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आला निवेदनात म्हटले आहे की
कोपरगाव शहर व तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून विद्युत महामंडळाकडून लाईटचा जो लपंडाव चालू आहे त्यामुळे व्यापारी वर्गाला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असून प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार कोपरगाव शहर व तालुक्याची बाजारपेठ सुरू असून अनेक व्यवसाय लाईटच्या भरोशावर असून लाईटचा जो लपंडाव चालू आहे त्यामुळे अशा अनेक व्यावसायिकांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे .

त्याच बरोबर शाळा,कॉलेज बंद असल्या कारणाने सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम व पेपर हे मोबाईलवर ऑनलाईन चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत आहे, तसेच शाळा कॉलेज ॲडमिशन घेण्यासाठी लागणार्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सेतू कार्यालय,झेरॉक्स तहसील कार्यालय अशा अनेक कार्यालयांमध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांनीबरोबर पालकांची देखील गर्दी पहावयास मिळते, परंतु लाईटच्या याला पण दाबामुळे यांना अनेक वेळा तासन्तास या कार्यालयांमध्ये लाईट ची वाट बघत बसावे लागत असून लाईटची समस्या कमी करण्यापेक्षा विद्युत महामंडळ मात्र सक्तीची लाईट बिलची बिलेच जमा करण्यात व्यस्त आहे, तसेच अनेक ठिकाणी विद्युत तारांमध्ये झाडांच्या फांद्या गुंतलेल्या असून अनेक वेळा स्पार्किंग होते त्यामुळे देखील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकते त्याकडे मात्र वीज महामंडळाचे लक्ष नसते.
येत्या आठ दिवसात हा लाईटचा लपंडाव जर बंद न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने खळखट्याक आंदोलन करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळावर व प्रशासनावर राहील ,

या वेळी मनसे शहराध्यक्ष सतीश आण्णा काकडे, माजी तालुका अध्यक्ष अलीम शहा,उप तालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते,उपशहराध्य विजय सुपेकर, विद्यार्थी जिल्हा संघटक बंटी सपकळ,विध्
विद्यार्थी शहराध्यक्ष आनंद परदेशी, विद्यार्थी उपशहराध्य संजय जाधव ,वहातुक शहराध्य सचिन खैरे, मनसे युवा नेते नवनाथ मोहिते ,राजू जाधव, मोहन चव्हाण, संतोष जाधव आदी मनसे सैनिक उपस्थितत होते.
