
कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-
नाशिकच्या वडाळागाव परिसरातील सैय्यद मन्सूरअली रंगरेज हे गेल्या २५ वर्षांपासून ऑफ्टीकल क्षेत्रात काम करतात. त्यांनी वडाळागाव येथे नव्याने उभारलेल्या नुरी ऑफ्टीकलचे आज मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी दिव्य ज्योती आय क्लिनिकचे डॉ.मनोज गंगवाल, नईम शेख, मोसिन शेख, सैय्यद अख्तार, सैय्यद बशीर बाबा, आसिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ.शेफाली भुजबळ यांनी नुरी ऑफ्टीकलचे उद्दघाटन करून नेत्र सुविधेसाठी कार्यरत असलेल्या नुरी ऑफ्टीकलच्या संचालकांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
