हक्काच्या पाण्यासाठी, जनतेनेच सक्रिय व्हावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव

“पाणी वाढ ग माय”
कोणी पाणी देता का पाणी”….?
कोपरगाव प्रतिनिधी:-
मित्रानो ही आर्त हाक आहे कोपरगाव शहरातील गोर गरीब कष्टकरी सर्व सामान्य जनतेची…
कोपरगाव,श्रीरामपूर, आता राहता,वैजापूर व येवला हे तालुके पर्जन्य छायेतील तालुके जेमतेम पडणारा पाऊस शेतीची दुष्काळी परिस्थिती ने वाट लागलेली मात्र ब्रिटिश सरकारने या तालुक्यात परिवर्तनाचा चंग बांधला,आणि गोदावरी नदीच्या व इतर नद्यांच्या कायम वाहणाऱ्या पाण्याच्या साठवणुकी करिता धरणे बांधली आणि मग हे पाणी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याने या तीन चार तालुक्यात आले आणि या तालुक्याची शेती सुजलाम सुफलाम झाली.एके काळी आमचा तालुका कॅलेफोर्निया होता म्हणे,
तालुक्यात पाच खाजगी साखर कारखाने होते पुढे सहकार चळवळ उभी राहिली आणि सहकारी तत्वावर साखर कारखाने उभे राहा
तालुक्याचे दोन दिग्गज नेते काळे साहेब व कोल्हे साहेब साखर करखान्या बरोबरच अनेक उद्योग व्यवसाय आणले गाव खेड्यातील लोक शहराकडे धाव घेऊ लागले,पूर्वीच्या साखर कारखान्याचे कामासाठी राज्याच्या विविध भागातून आलेला मजूर कारखाने बंद झाल्याने शहरात काम धंद्याच्या शोधत स्थिरावला
कधी काळी बारमाही वाहणारी गोदामाई व बारमाही वाहणारे कालवे मात्र हळूहळू वरील भागात नाशिक व खालच्या भागात औरंगाबाद ही मोठी शहरे व औद्योगिक वसाहत यामुळे आमच्या कडे असलेल्या बारमाही पाण्यावर हक्क सांगू लागले आणि हळूहळू आमची कारखानदारी व शेती उध्वस्त होऊ लागली नव्हे तर झाली
आमच्या हक्काचे 11 TMc पाणी व त्या साठी आमच्या राजकीय नेत्यांनी सर्वोतोपरी संघर्ष केला मात्र शेती बरोबरच दुर्दैवाने पिण्याचे पाणी देखील गेले….
कधी काळी कोपरगाव शहराला रेशनकार्ड वर पाणी देण्याची नामुस्की ओढवली मोठा संघर्ष झाला पाण्यावरून दंगल झाली मात्र तेंव्हापासून सुरू झालेला पाण्याचा संघर्ष अद्याप संपला नाही
कोपरगाव शहराचे राजकारण पाण्यावर अवलंबून आहे असे बोलले जाते अनेक वर्षांपासून तालुक्याच्या व शहराच्या निवडणुका पाणी प्रश्नावर लढल्या गेल्या जनतेला पाणीदार स्वप्न दाखवले गेले निवडणुकीच्या फडात पाणी गाजले मात्र पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नक्की कोणी किती व कोणते प्रयत्न केले ते त्या विधात्याला माहीत
आजकाल खेडोपाडी पाणी योजना सुरू झाल्या कायम दुष्काळी असलेल्या येवला व वैजापूर चा पिण्याच्या पाण्या करिता एव्हडे हाल नाहीत त्या पेक्षा जास्त हाल कोपरगावच्या जनतेच्या नशिबी आलेत
कधी निळवंडे तर कधी पाच नंबर असे अनेक प्रयत्न झाले असे राजकीय नेत्यांच्या वक्तव्य वरून समजते
पाणी योजना ही एका दिवसात होणारी नाही… आणि मात्र ती पुढील संभाव्य लोक संख्या लक्षात घेऊन उभारणी करणे आवश्यक आहे त्या करिता पाठपुरावा होणे आवश्यक होते मात्र आजही १९९० च्या लोकसंख्येच्या आकडेवारी नुसारच शहराला त्या प्रमाणात पाणी दिले जाते,..
मागील निवडणुकी पूर्वी तळ्यातील गाळ काढला नंतर मात्र ते काम देखील नियमित पाणी देऊ शकले नाही
दारणा धरण ते साठवण तलाव हे मोठे अंतर त्यातच कालव्याला शंभर वर्षे झाली त्यावर अनेक पाणी योजना तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकारी यांच्या अवकृपे ने होणारी पाणी गळती मात्र त्याचा फटका बसतो तो कोपरगाव शहराच्या जनतेला ..कारण धरणातून तुमच्या वाट्याचे पाणी तोलूम मापून दिले जाते मात्र होणारी गळती व साठवण तलावाची दुबळी झोळी
मागील निवडणूक गाजली तीच मुळी पिण्याच्या पाणी प्रश्नावर…
मग माजी आमदार यांनी निळवंडे पाईप लाईन तर विद्यमान आमदार यांनी पाच नंबर तळे अशा योजना मांडल्या विद्यमान नगराध्यक्ष यांनी मी स्वच्छ व नियमित पाणी देणार अशी भीष्म प्रतिज्ञा केली मात्र आजून तरी नागरिकांचा पाण्याचा वनवास संपला नाही
खरं तर
●दारणा ते साठवण तलाव या दरम्यान होणारी पाणी गळती ( चोरी ) थांबवणे आवश्यक आहे यात एक वेळचे पाणी मिळू शकते
●साठवण तलावाचे अस्तरीकरण होणे आवश्यक आहे यात एक वेळचे पाणी मिळू शकते
● पाण्याची टाकी ते नागरिकांचे नळ ही देखील मोठी गळती व मुख्य पाईप लाईन चे कनेक्शन यातून काही पाणी मिळू शकते
मात्र या उपयाकडे कोणी गांभीर्याने लक्ष दिले नाही
पाणी प्रश्नावर प्रयत्न सगळे करतात, टीका टिपण्णी होते मात्र ठोस उपाय निघत नाही
मात्र राजकारणापासून दूर राहून पाणी प्रश्नावर एक शिलेदार एकाकी झुंज देत आहे राजेश मंटाला….
कारण त्यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी मिळावे म्हणून ध्यास घेतला असून पंत प्रधान यांच्या पासून नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या पर्यंत थेट ई- मेल, पत्रव्यवहार, फोन करून पाठपुरावा करत असून कधी नव्हे असे डिजिटल जन आंदोलन उभे केले व काही प्रमाणात का होईना पण त्याला यश मिळताना दिसत आहे आज कोणत्याही कार्यालयात
कोपरगाव च्या पाण्याचा प्रश्न धाडसाने व न डगमगता राजेश मंटाला मांडत असून
” मी राजेश मंटाला बोकतोय ” असं म्हटलं तरी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो शहरातील तरूण,महीला,सामाजिक राजकीय कार्यकर्ते, व्यापारी,मजूर राजकीय नेते ” मी राजेश मंटाला ” या हक्काच्या पाण्यासाठी च्या लढ्यात “पाणी द्या संघर्ष समितीत ” सामिल होवून मोठी लढाई फक्त पाणीप्रश्नी करण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत,…. जर कोणी आता पाण्याला राजकीय स्वार्थापोटी विरोध केला तर आता पाण्यासाठी होणा-या जनसंघर्षच्या क्रोधाने तो नक्कीच भस्म झाल्या शिवाय राहणार नाही,….पाण्यामुळे शहराची बाजारपेठ, अर्थव्यवस्था, शिक्षणव्यवस्था,आरोग्य सगळंच काही धोक्यात आलं आहे,….जो कोणी नेता हक्काच्या पाण्यासाठी निस्वार्थ पणे या “पाणी द्या संघर्ष समितीत” जनतेसोबत रस्त्यावर येवून सामील होईल व्हावे
मात्र निवडणूक तोंडावर आल्यावर पाण्यासाठी गळे काढणारे नेते आणि प्रत्यक्ष पाणी मिळावे म्हणून लढणारे यांच्यात फरक आहे
निवडणुका येतील, जातील .. अनेक प्रश्न ऐरणीवर येतील काही प्रश्न सूटतील काही तसेच राहतील टीका टिपण्णी होतील आरोप प्रत्यारोप होतील मात्र कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न अनेक दिवसांपासून भिजत असून जनता मात्र पाणी वाढ ग माय… व कोणी पाणी देता का ? पाणी अशी आर्त हाक देत असून आम्ही दोन दिवसांची शिळी भाकरी, भाकरी खात नाही,आम्ही तीन चार दिवसाची नासकी कुजकी फळे खात नाही मात्र आम्ही आठ दहा दिवसाचे जंत झालेले वास येणारे पाणी वापरतो आणि तेही शाश्वत नाही मग चला तर कोपरगाव शहराच्या हक्काच्या व शाश्वत पाण्यासाठी प्रत्येकाच्या घरातील प्रश्नासाठी
पाणी द्या संघर्ष समिती मध्ये आपले योगदान देऊ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *