पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सटाण्यातील भाजप पदाधिकारी व मनमाड मधील सामाजिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!!

कोपरगाव

नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध:- मंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्षात योग्य तो सन्मान राखला जाईल. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे असलेले प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात सटाणा येथील भाजप कार्यकर्ते तर मनमाड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण,माजी आमदार संजय पवार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, बागलाण तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष पांडूनाना सोनवणे, नांदगांव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, माजी सरपंच अरुण सोनवणे, माजी सरपंच बाळासाहेब देवरे, अनिल चव्हाण, गणेश पवार, सुयोग अहिरे, परेश देवरे, चेतन देवरे, नाना शिंदे, युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सोनवणे, योगेश जाधव, अक्षय देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येऊन पक्ष संघटना अधिक बळकट करण्यात यावी. ज्या पदाधिकाऱ्यांनी आज पक्षात प्रवेश केला आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला जाईल तसेच लोकहिताची सर्व कामे मार्गी लावली जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत चौंधाने, ता.बागलाण येथील भाजपाचे तालुका उपाध्यक्ष व माजी सरपंच प्रकाश मोरे, वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन भगवान मोरे, संजय मोरे, संजय शेवाळे, प्रवीण मोरे, मच्छिंद्र मोरे, भगवान मन्साराम मोरे, बाळू मोरे, श्यामकांत मोरे, दत्तू मोरे, मुरलीधर खैरणार, एकनाथ मोरे, रोशनी मोरे, विमलबाई मोरे, दिनेश मोरे, आप्पा पवार, खंडू मोरे, मनोहर मोरे, राहुल वाघ, मोरे नगर, ता.बागलाण येथील भाजपा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष व माजी सरपंच सुरेश आहिरे, विनोद बोरसे, कमलाकर वाघ, राज वडजे, रवि बोरसे, दादा बोरसे, गुलाम शेख, धनराज वाघ, अजित खैरनार, शंकर देवरे, बापू मोरे, प्रभाकर मोरे, राजेंद्र मोरे
यांनी तर मनमाड, ता.नांदगाव येथील युवा सल्लामंच संस्थापक अध्यक्ष शुभम गायकवाड, युवा सल्लामंच शहराध्यक्ष सागर राजगिरे, श्रीराज कातकाडे, राहुल गवळी आदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *