शासनाच्या नियमांचे पालन करून तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- देशात व राज्यात मागील काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाच्या चिंता वाढलेल्या आहेत. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
राज्यात आलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव व ओमायक्रॉन या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालय कोपरगाव येथे कोपरगाव तालुका कोविड टास्क फोर्स व प्रशासनाच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकी दरम्यान आ. आशुतोष काळे यांनी गावागावातील कोरोना समित्यांनी सक्रीय होवून ज्या नागरीकांचे अद्याप लसीकरण झालेले नाही किंवा ज्या नागरिकांना दुसरा डोस घेणे बाकी आहे त्या नागरिकांचे तातडीने लसीकरण करून घेण्याच्या सूचना केल्या. पोलीस प्रशासनाने नागरिकान मास्क वापरण्यासाठी प्रवृत्त करावे. नागरिकांनी देखील स्वतःहून शासनाच्या नियमांचे पालन करून आपल्या व कुटुंबाचे आरोग्य आबाधित राहण्यासाठी नियमितपणे मास्क व सॅनिटायाझरचा वापर करावा.ऑक्सिजनच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही. कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथील ऑक्सिजन प्रकल्प व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा ऑक्सिजन प्रकल्पामुळे ऑक्सिजनची गरज भागणार असली तरी अशी परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोपरगांव तालुक्यातील नागरिकांनी व्यापारी संघटना, राजकीय संघटना, सामाजिक संघटना यांनी केलेल्या सहकार्यातून आपण कोरोनाच्या दोन्ही लाटेचा यशस्वीपणे सामना केला असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा देखील यशस्वीपणे मुकाबला करून तिसरी लाट परतावून लावू असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी तहसीलदार विजयजी बोरुडे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, कारभारी आगवन, जिल्हा परिषद सदस्या सोनाली रोहमारे, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस निरिक्षक वासुदेव देसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. अजय गर्जे, डॉ. महेंद्र गोंधळी, डॉ. अमोल अजमेरे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. रणदिवे, डॉ. पाखरे, डॉ. आतिष काळे, डॉ. वरद गर्जे, डॉ. गायत्री कांडेकर, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल, कृष्णा आढाव, रमेश गवळी, संतोष बारसे, मनसेचे अनिल गायकवाड, युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे, दिनकर खरे, फकीर कुरेशी, जयंतराव रोहमारे, राजेंद्र खैरनार, राहुल जगधने, वाल्मिक लहिरे, विजय जाधव, दिलीप शिंदे, विकास शर्मा, योगेश गंगवाल, घुले, विठ्ठल जावळे, सुनील साळुंके,

फोटो ओळ:- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव व ओमायक्रॉन या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आढावा बैठकीत मार्गदर्शण करतांना आ.आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *