वृक्षसंवर्धनातुन स्मृती जागविण्याचे कार्य महान सिनेअभिनेता चिन्मय उदगीरकर : वारीत स्वर्गीय राहुल टेके पाटील यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण…!

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
वारी ग्रामपंचायतीचे सदस्य स्वर्गीय राहुल टेके पाटील यांचे सामाजिक कार्य खूप मोठे होते. याच माध्यमातून तीन वर्षापूर्वी त्यांची माझी भेट झाली होती. त्यांना पर्यावरणाबद्दल खूप आस्था होती. वृक्ष लागवड करुन त्यांच्या संवर्धनासाठीचे कार्य खूप मोठे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार परिश्रम घेत आहे. हिच महत्वपूर्ण बाब असून यातूनच त्यांची स्मृती कायम राहणार आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील दिगवंत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांच्या स्मरणार्थ राहुल दादा टेके पाटील चेरिटेबल ट्रस्ट व कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या विशेष सहकार्यातून सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर व सिनेअभिनेत्री मयुरी कापडने यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.१२) वारी येथे वड, पिंपळ, चिंच व कडूलिंब या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
अभिनेत्री मयुरी कापडने म्हणाली, पर्यावरणात झाडांचे खूप महत्व आहे. झाडे लावण्यासंदर्भातील फायदे आपण सर्वच ऐकतोच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लाऊन त्यांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे.
या सोहळ्यासाठी गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, कामगार नेत्या वंदना पवार, माजी सभापती मच्छिंद्र टेके, मुख्याध्यापक मंजुषा सुरवसे, सोमैया उद्योग समूहाचे संचालक सुहास गोडगे, उपमहाव्यवस्थापक बी. एम. पालवे, बी. पी. पाटील, वरिष्ठ कामगार अधिकारी संजय कराळे, वारी सेवा संस्थेचे माजी संचालक मधुकरराव टेके, सामाजिक कार्यकर्ते विशाल आढाव, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संजय टेके, विशाखा निळे, मच्छिंद्र टेके महाराज, उपसरपंच मनीषा गोर्डे, सदस्या रोहिणी निळे, सुवर्णा गजभिव, अनिता संत, वनिता चव्हाण, नंदा निळे, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, गोरख टेके, सुदाम टेके, सुनील टेके, वसंत टेके, मंजाहरी टेके, पंडित वीर, धोंडीराम, हिवरे, कैलास इथापे, रामदास सोनवणे, अशोक टेके, भीमा आहेर, धोंडीबा वाकचौरे, नितीन चौधरी, सुखदेव मैंद, विलास गोंडे, शंकर गोंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुकर सोनवणे विजय निळे, बापू वाकचौरे, अशोक निळे, सुरज बोर्डे, रघुनाथ आहेर, मच्छिंद्र मोरे, भास्कर बोर्डे, सचिन मोकळ, आप्पासाहेब थोरमीसे, सचिन मैंद, अजीम शेख, चंद्रकांत पाटील, दौलत वाईकर, मच्छिंद्र मुरार, प्रा. रविंद्र जाधव, ‘लोकमत’चे उपसंपादक रोहित टेके, सुरज टेके, प्रथमेश टेके, स्वप्नील टेके, बिपिन टेके, पुरुषोत्तम टेके, साईराज टेके, अनुराग टेके यांच्यासह मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळी:-
वारी ( ता. कोपरगाव ) येथे सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर व सिनेअभिनेत्री मयुरी कापडने यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *