
दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा पारितोषिक सोबत एक व्यक्ती एक झाड वितरणास प्रारंभ…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील सूर्यतेज सामाजिक संस्थेच्या वतीने कला, सांस्कृतिक,पर्यावरण विविध कल्पक उपक्रम लोकसहभागातून आयोजित केले जातात.संस्कृती-परंपरा आणि पर्यावरण टिकवण्याचे कल्पक उपक्रम उल्लेखनीय असून प्रेरणादायी असल्याचे सामाजिक वनीकरणच्या वन क्षेत्रपाल पुजा पिंगळे (रक्ताटे) यांनी सांगितले.

सूर्यतेज संस्था कोपरगाव आयोजित कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा २०२० ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे प्रातिनिधिक पारितोषिक वितरणासोबत स्वच्छ-जलशक्ती- हरित पर्यावरण अभियान २०२१ व जिल्हाधिकारी डॉ.श्री.राजेन्द्र भोसले यांचे आवाहनाला प्रतिसाद म्हणून एक व्यक्ती-एक झाड प्रातिनिधिक मोफत वितरण करण्यात येत आहे.
याप्रसंगी सामाजिक वनीकरणच्या वनक्षेत्रपाल पुजा पिंगळे(रक्ताटे), वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे, सूर्यतेज ज्येष्ठ मार्गदर्शिका प्रा.लताताई भामरे ,अॅड.स्मिताताई जोशी,आयुर्वेद तज्ञ डॉ.राजेंद्र वाघडकर,डॉ.निलिमाताई आव्हाड,प्रा.रश्मीताई जोशी,प्रा.मंगलाताई राजेभोसले,प्रा.दिपालीताई पटवर्धन,सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,प्रा.अनिल अमृतकर उपस्थित होते.
आषाढी एकादशी-२००१ रोजी “सूर्यतेज” संस्था कोपरगाव ची स्थापना “उजळूया अंधार सारा” हे ब्रीद घेवून करण्यात आली आहे.सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून गेल्या २० वर्षांच्या कालखंडात वही वाटप, विविध शिबीर-स्पर्धा,कला-नाट्य स्पर्धा,क्रीडा स्पर्धा, कोपरगाव फेस्टिव्हल, दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा, मराठी भाषा दिवस, विविध आपत्कालीन काळात गरजूंना मदत असे विविध उपक्रमासह स्वच्छ भारत अभियान, जलशक्ती अभियान,वन महोत्सव,माझी वसूंधरा अभियान या माध्यमातून वृक्षारोपण आणि पालकत्व अभियान राबविण्यात येत असते. आत्तापर्यंत या उपक्रम अंतर्गत कोपरगाव,राहाता आणि वैजापूर तालुक्यात सुमारे ५० हजारचे पुढे रोपांचे मोफत वितरण,रोपण आणि पालकत्व दिले आहे.यात विविध ठिकाणी शोभेची झाडे रोपण केली असून तेथील सौंदर्यात भर पडली आहे.तसेच पर्यावरण युक्त, शुध्द हवेसाठी ऑक्सिजन देणारी झाडे कडूलिंब,वड,पिंपळ…या सारख्या झाडांचे रोपण करुन पालकत्व दिले आहे.तसेच वन्यजीव संरक्षण,पक्षी संवर्धन सारखे विषयावर जनजागृती करुन पर्यावरण संवर्धन कार्य निरंतर सुरू आहे.
या निमित्ताने संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या संतांचे विचार मुद्रीत केलेल्या पर्यावरण पुरक कापडी पिशवीचे अनावरण करण्यात आले आहे.
या प्रसंगी भूलतज्ञ पदवी संपादन केलेच्या डॉ.मुग्धा हेमंत पटवर्धन यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.सुत्रसंचलन ऐश्वर्या बिडवे यांनी केले.
उर्वरित बक्षीस विजेत्यांना पारितोषिक व रोप वितरण घरपोच करण्यात येणार आहे.या उपक्रमास प्रा.दत्तात्रेय गवळी,सौ.सरिताताई कोर्हाळकर, अभिजित शिरोडे,अॅड. महेश भिडे,किरण शिरोडे यांचे सहकार्य लाभले असून वितरणाचे सहकार्य प्रा.अतुल कोताडे,प्रा.मतीन दारुवाला,सौ.सुरेखाताई आव्हाड,सौ.सिमाताई भिडे,प्रा.माधवी पेटकर,सौ.पल्लवीताई भगत,दर्शना हलवाई, कल्पेश टोरपे,महेश थोरात,वंदना अलई यांचे सह सूर्यतेज परिवारचे सदस्य सहकार्य करणार आहे.
स्वच्छ-शुध्द हवेसाठी प्रत्येकाने एक झाड लावावे,त्याचे पालक व्हावे.असे आवाहन सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले आहे.
