
कोपरगाव प्रतिनिधी:-
राहुरी अर्बन पतसंस्थेचे वतीने जिल्हाधिकारी साहेबांच्या एक व्यक्ती एक झाड संकल्पने नुसार महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचा वृक्ष देऊन सन्मान करणेत आला.
या प्रसंगी ग्रामीण पत्रकार संघाचे राहुरी तालुका अध्यक्ष गोविंद फुणगे, ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे , सचिव अनिल कोळसे, कार्याध्यक्ष राजेंद्र आढाव, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण पटारे, राहुरी शहर अध्यक्ष शरद पाचारने, उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र आढाव, तालुका सचिव आकाश येवले, संघटक संदिप पाळंदे , तालुका सरचिटणीस कमलेश विधाटे, खजिनदार जावेद शेख, समन्वयक रूषी राऊत, सह सरचिटणीस सचिन पवार व जिल्हा कार्यकारीणी रमेश जाधव आदींची निवड झाले बद्दल राहुरी फॅक्टरी येथील राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक चेअरमन रामभाऊ काळे व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले साहेब यांचे एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना राबवून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा वृक्ष भेट देऊन सत्कार केला.
