
कोपरगाव प्रतिनिधी:-
ओबीसी बांधवांचे राजकीय आरक्षण गमावणाऱ्या व मराठा बांधवांच्या आरक्षण लढाईत कमी पडलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर-मनमाड महामार्गावर श्री साईबाबा कॉर्नर कोपरगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करत राज्य सरकार ओबीसींचे राजकिय आरक्षण गमावण्यात कसे जबाबदार आहे,मराठा आरक्षण,शेतीचा व पिण्याचा पाणी प्रश्न,वीज व्यवस्था अशा सर्वच प्रश्नांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या…!!


युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी राज्यसरकारचे आरक्षण विषयक निष्क्रिय धोरण आहे पण प्रत्येक लढाईत कोल्हे कुटूंबाचा सामाजिक प्रश्न हाती घेऊन लढण्याचा पिंडच असल्याचे सांगत जसे राज्य सरकार निष्क्रिय आहे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी कसे केवळ प्रसिद्धीचा प्रकार करतात आणि जुन्याच मंजूर कामांवर केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोनशीला लावून प्रत्यक्षात जनतेला वाऱ्यावर सोडले आहे याचे अनेक दाखले दिले..यासह मोठ्या प्रमाणात निधी मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघासाठी मिळविला ज्यावर आजही कामे सुरू असून त्या कामांवर पाट्या लावण्याचा छंद जोपासला जात आहे असा खोचक टोला लगावला..स्थानिक पातळीवर सर्व निवडणुकांमध्ये कोल्हे परिवार आणि भारतीय जनता पार्टी कोपरगाव मतदारसंघात ओबीसींना त्यांचा हक्क अबाधित ठेवून न्याय देत राहणार असे सूतोवाच देखील विवेकभैय्या कोल्हे यांनी केले..!!
या प्रसंगी अनेक मान्यवरांनी राज्य सरकारच्या कुचकामी धोरणा विरोधातील आपल्या भावनांना तीव्र वाट मोकळी करून दिली..!!
या प्रसंगी कोपरगावचे तहसीलदार श्री.योगेशजी चंद्रे साहेब यांनी निवेदन स्वीकारले,त्यावेळी शहर पोलीस निरीक्षक श्री.वासुदेवजी देसले साहेब उपस्थित होते..!!
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी,ओबीसी समाज बांधव,विविध संस्थांचे संचालक,नागरिक,पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!
