कोपरगाव प्रशासनाकडून कोपरगावकरांची लसीकरण प्रमाणपत्र तपासणी मोहीम..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावात प्रशासनाची लसीकरण प्रमाणपत्र तपासणी मोहीम
कोपरगावचे तहसिलदार विजय बोरूडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप. सहाय्यक पोलीस निरीक्षक दाते, कामगार तलाठी तांडगे आप्पा आदी सह महसूल पोलीस अधिकारी यांच्या पथकाने दि. १५ डिसेंबर रोजी शहरातील गुरुद्वारा रोड,विघ्नेश्वर चौक,ते बसथांबा परीसरात लसीकरण प्रमाणपत्र तपासणी मोहीम राबविली आहे.


या मोहीमेत प्रत्येक दुकान,मॉल, हातगाडीवर जाऊन तेथील मालक,कामगार व ग्राहक यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्हींही डोस घेतले कि नाही तसेच त्यांच्याकडे लसीकरण प्रमाणपत्र आहे कि नाही याची तपासणी केली.कामगारांनी लस घेतलेली नसेल तर त्यांचे तेथेच लसीकरण करून कामगारांकडुन ५०० रुपये,सदर दुकान मालकास १०,००० रुपये तर मास्क न वापरणाऱ्या नागरिकां कडून प्रत्येकी ५०० रुपये या प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शासकीय आदेशानुसार कोरोनापासुन बचाव करण्यासाठी सध्या तरी लसीकरण हाच एकमेव उपाय असुन प्रत्येक नागरिकाने लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे परंतु काही बेफिकीर नागरीकांना अजूनही या गोष्टीचे गांभिर्य लक्ष्यात येत नसल्याने हि कारवाई करण्यात आली आहे,तरी नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे असे आवाहन तहसिलदार विजय बोरूडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *