
कोपरगाव प्रतिनिधी:- राज्यात असलेले सरकार हे लबाडीने सत्तेत आलेले आहे . त्यांनी राज्यातील ओ बी सी आणि मराठा समाजाचं आरक्षण घालवण्याचे पाप केले असल्याचा आरोप भाजपाच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केला . कोपरगांव शहर,तालुका भारतीय जनता पक्ष व सर्व सेलच्यावतींने महाविकास आघाडी शासनांने ओबीसी वर्गाचे आरक्षण रद्द केले त्या निषेधार्थ व सिंचन पाण्यांचे आर्वतन, खरीप पिक विमा, आणि शेतक-यांना वीजपुरवठा सुरळीतपणे मिळावा यासाठी येथील साईबाबा काॅर्नरवर शनिवारी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, जिल्हा बॅंकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेर्तृत्वाखाली दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यांत आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सौ कोल्हे पुढे म्हणाल्या कि इतरमागासवर्गीय ओबींसींचे राजकीय आरक्षण काढुन घेतले तर जनता तुम्हांला तुमची जागा दाखवेल, नाकर्त्या शासनाचा आपण निषेध करीत असून कि संघर्षाने प्रश्न मांडुन भांडल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही, सत्तेतील मंत्री व लोकप्रतिनिधी खुर्च्या वाचविण्यांचे काम करत आहे गोरगरीब व ओबीसीविरूध्द होणांरा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही . सौ.कोल्हे पुढे म्हणांल्या की, राज्यातील महाविकास आघाडी शासन व येथील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना ओबीसी वर्गाचे मतदान घेतांना गोड लागले मात्र त्यांचे आरक्षण काढुन घेतांना जराही वाईट वाटले नाही हा तुम्हां आम्हांवर अन्याय असुन जखमेवर मीठ चोळण्यांसारखे आहे. तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठयांना टिकणांरे आरक्षण दिले पण महाविकास आघाडी शासनांने ते काढुन घेतले. कोपरगांव वासियांवर आलेल्या प्रत्येक संकटात संजीवनीच सर्वप्रथम धावून आली आहे. लबाडीतुन सत्तेत आलेले महाविकास आघाडी सरकार आणि येथील आमदार गोर गरीब मागासवर्गीय ओबीसी समाजावर आरक्षण काढुन अन्याय करत आहे ते आम्ही कदापीही सहन करणार नाही त्यासाठी सर्वांनी संघटीत होवुन रस्त्यावर येवुन संघर्ष करण्यंाची वेळ आता आली असल्याचे सौ. कोल्हे म्हणांल्या. कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष व जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणांले की, कोरोना काळात महाविकास आघाडी शासनांने असंख्य चुकीचे निर्णय घेतल्यांने त्याची शिक्षा आपण भोगत आहोत, ओबीसी वर्गाचे आरक्षण काढुन त्यांचेवर अन्याय कराल तर त्याची पहिली ठिणगी कोपरगांवातुन पडेल आणि त्याचा वणवा संपुर्ण महाराष्ट्रभर पसरेल असा इशारा देवुन येथील सत्ताधारी फोटो आणि खोटे सम्राट आमदारांनी कोपरगांव शहरवासियांचे थेट निळवंडेतुन बंद पाईपलाईनद्वारे येणांरे पाणी बंद केले आणि नागपुर समृध्दी महामार्गाची स्मार्टसिटी घालविण्यांचे पाप केले त्याची माफी साईबाबा दरबारी मागुन ती पुर्ववत करावी, कुणांलाही खोटे आश्वासने देवुन गाजर दाखविण्यांचे काम बंद करून जनतेला वेडयात व मुर्खात काढुन कोल्हे परिवारावर टीका करून राजकीय पोळी भाजु नये. रस्तारोको, धरणे, चक्काजाम, जेलभरो आंदोलने हा कोल्हे परिवाराचा पिंड असुन अन्यायाविरूध्द सतत संघर्श करून न्याय देण्याची आमची परंपरा आहे. मतदार संघात होणां-या विकासकामांसाठी कुणी निधी मिळविला हे त्यांनी जनतेला प्रमाणिकपणे सांगावे. प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंती निमीत्त त्यांना अभिवादन करण्यांत आले. भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्तविक केले. गटनेते रविंद्र पाठक व शहराध्यक्ष डी आर काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, कोल्हे कारखान्यांचे संचालक प्रदिप नवले, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपसभापती वैशाली साळूंके, रिपाईचे जितेंद्र रणशुर, भाजपा उपाध्यक्ष प्रभाकर शिन्दे, नगरपालिका शिक्षण मंडळाचे विनोद राक्षे, माजी सभापती मच्छिंद्र केकाण, सुनिल देवकर, माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर यांनी महाविकास आघाडी शासनाचा निषेध नोंदवत ओबीसी वर्गाचे आरक्षण पुर्ववत मिळालेच पाहिजे अशी मागणी केली. कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. चक्का जाम आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतुक मोठया प्रमाणांत ठप्प झाली होती. सुत्रसंचलन दिपक चौधरी यांनी केले तर भाजपाचे शहराध्यक्ष डी. आर. काले यंानी आभार मानले.
