
कोपरगाव प्रतिनिधी:-
पाणी एवढे चवदार का वाटलं मला?
विचार केल्यावर कळले . पाण्यात ओलावा होताच , पण त्यात माझी तहानही मिसळली होती . पाण्याला चव आली होती ती माझ्या तहातेमुळे ! गोष्ट तीच असते . पण त्यात आपली अनावर उत्सुकता किती मिसळते.त्यावर त्याची चव ठरत असावी . खूप गोष्टी सहजपणे आणि विपुलतेने मिळाल्या की त्यातली चव निघून जाते . लायब्ररीच्या शेजारीच रहाणारा पुस्तकाचे एक पानही न उलगडणारा असु शकतो पण रानावनातला नुकताच शाळेच्या चार इयत्ता पुढे गेलेला गुराख्याच पोर रदीतला कागद तडफडून वाचतो , त्याचे डोळे चमकतात . आपल्या मुलांना नव्या कपड्यांचा ढीग जाणून द्या . ती याहून चांगले हवं ‘ म्हणून नाक मुरडतीला पठा अनाथाश्रमातल्या एकाकी मुलीला साधा नवा फ्रॉक घेऊन द्या . ती दिवसभर परी होऊन लहरत राहील … अंतरीची गरज तीव्र असेल , तरच गोष्टीना अर्थ येतो . जसं शिक्षा , व्यवसाय.पैसा.प्रवास सहज मिळत गेले की किंमत नसते । ज्याला हे उपलब्ध होत नाही ना . त्यालाच याच मोल। पाण्यात तहात मिसळायला हवी हेच खरं । पाण्यालाही तहान असते . अशा तहानलेल्या ओठांची !
सुखेखन- गोरे सर:-
9850 613 612
