सहकारमहर्षी कोल्हे कारखाना येथे मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबीर संपन्न…


नियीमत व्यायामाने आरोग्य सुधारते – बाळासाहेब वक्ते…
कोपरगाव प्रतिनिधी:-
दैनंदिन धावपळीच्या जीवनांत आपल्या मनाविरूध्द सतत अनेक गोष्टी घडत असतात, तेंव्हा प्रत्येकांने नियीमत व्यायाम, योगोपासना करावी, आहाराचे संतुलन ठेवावे त्यातुन मनुष्याचे आरोग्य सुधारते असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले.
तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, पदाधिकारी, कामगार बांधवांसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संजीवनी युवा प्रतिपष्ठान व संत जनार्दन स्वामी हॉस्पीटल (कोपरगाव) यांच्या सहकार्याने मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते त्याचे उदघाटन मंगळवारी झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक त्रंबकराव सरोदे होते.
प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. साहिल माळी प्रास्तविक करतांना म्हणाले की, प्रत्येकांने आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, वाढता रक्तदाब, मधुमेह यातुन शरीराची मोठी हानी होते तेंव्हा नियीमत तपासणी व वैद्यकिय सल्ला महत्वाचा आहे. काम करतांना मन स्थिर ठेवावे, घरातील, रोजच्या जीवनांतील ताण तणाव कधीही कामाच्या ठिकाणी आणू नये त्यातुन स्वतः बरोबरच व्यवस्थापनाचेही आरोग्य बिघडते. शरीरावर असणारी गाठ, अनेक दिवसापासुनची जखमी तात्काळ वैद्यकिय अधिका-यांना दाखवा त्यावर नियमीत वैद्यकिय उपचार घ्या.
बाळासाहेब वक्ते पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्तीगत वाढदिवसाला शाल, हारतुरे, भेटवस्तु न स्विकारता समाजाच्या विधायक कार्यासाठी सत्कर्मातुन साजरा होणा-या वाढदिवसाला ते सतत महत्व देतात. सेवा हाच धर्म मानून ते परोपकाराची भावना ठेवतात त्यामुळेच आदिवासी वाडया-वस्त्या, वैद्यकिय सेवेपासुन वंचित असलेल्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्यावर त्यांचा विशेष भर आहे. अध्यक्षपदावरून बोलतांना त्रंबकराव सरोदे म्हणांले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी प्रत्येक आपत्तीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमांतुन मदत केली आहे तोच वसा बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार विवेक कोल्हे पुढे चालवत आहे. या आरोग्य शिबीरराचा सर्वांनी लाभ. घ्यावा.
याप्रसंगी संचालक सर्वश्री. राजेंद्र कोळपे, सोपानराव पानगव्हाणे, बापूसाहेब औताडे, रामभाऊ कासार,महेश रक्ताटे, सीओओ शिवाकुमार, संजीवनी ग्रुप हेड संजीव पवार, एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी, डॉ. उबाळे, यांच्यासह विविध खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.संचालक राजेंद्र काळपे यांनी आभार मानले.
