Uncategorized

उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती विषयक जनजागृती कार्यशाळाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे एक दिवसीय “उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती” या विषयावर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, दि. 7 जुलै,2026 रोजी करण्यात आले आहे. ही कार्यशाळा कृषि विद्यापीठाच्या डॉ.नानासाहेब पवार सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे हे राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून ॲग्रीप्लास्ट टेक इंडिया प्रा. लि., बेंगळुरूचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी इंजि. राजीब कुमार रॉय तसेच सह्याद्री फार्म्स, नाशिकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विलास शिंदे उपस्थित राहणार आहेत.

       या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृ.) डॉ. साताप्पा खरबडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेचे संयोजक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एम. नलावडे आणि उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील असून कार्यशाळेचे समन्वयक डॉ. विक्रम कड, डॉ. सुनील कदम, डॉ. नितीन दाणवले आणि डॉ. जितेंद्र ढेमरे आहेत.
      कार्यशाळेमध्ये संदीप शिंदे आणि प्रमोद राजेभोसले हे उच्च तंत्रज्ञान शेतीतील संधी, शेतीमधील उद्योजकतेची गरज, स्टार्टअप्ससाठी इन्क्युबेशन सहाय्य व्यवस्था तसेच कृषी पदवीधरांसाठी ‘ग्रोथ माइंडसेट’ यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि कृषी क्षेत्रातील इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *