
कोपरगाव प्रतिनिधी :- कोरोना या जीवघेण्या महामारी तुन जनतेला मानवजातीला वाचवण्यासाठी, शासना व्यतिरिक्त सर्वे जाती धर्मातील मंदिर , चर्च , गुरुद्वारा , मस्जित यांनी स्वतःचा असलेला खजिना , पैसा बाहेर काढून लोकांना वाचवण्याची ही वेळ ओळखून , त्वरित स्वतः हा पुढे यावे असे मत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी मांडले आहे.
जथेदार बाबा कुलवंतसिंगजी तख्त सचखंड नांदेड चे प्रमुख पुजारी यांनी काल , ५० वर्षांपासून गुरुद्वारा मध्ये जमा झालेले , दान आलेले कोट्यवधी रुपये किमतीचे सर्वे सोने , चांदी नांदेड शहरात रुग्ण वाचवण्यासाठी, हॉस्पिटल , मेडिकल कॉलेज उभारणी साठी दिले , वापरायचे ठरवले ते रोज २ लाख लोकांना नांदेड जिल्ह्यातील जेवण त्यांच्या तर्फे देत आहे.या साठी सर्वे शीख बंधू यांचे आभार.देखील पाटील यांनी मानले आहे मानवजातीला वाचवण्यासाठी हीच खरी वेळ आहे , लोकांचे खूप २ वेळेच्या जेवनावाचून हालहोत आहे , कोरोना च्या भीतीने गोरगरीब जनता की जी भारतात मोठ्या प्रमाणात आहे , २ वेळेच्या जेवणासाठी जे रोज मोलमजुरी करून जगतात , खातात त्यांचे कडे सर्वे बंद लॉक डाउन असल्यामुळें घरीच बसून आहे, ते पैसा नाही या भीतीने पुढे यायला दवाखान्यात जायला घाबरत आहे , जेथे जेवायलाच काही नाही तर दवाखान्यासाठी पैसे कुटून आणणार व मध्यम वर्गीय माणसे , दुकानदार , छोटे शेतकरी ही यात पोळले जात आहे , या साठी मंदिर , चर्च ,मस्जित गुरुद्वारा सर्वांनी पुढे एवुुन जेवण , पेशंट / भक्ताला / जनतेला / मानवाला वाचवण्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी आपला पैसा , सोने , चांदी , ठेवी मोडून सामाजिक सेवे साठी पुढे यावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले आहे.
शीख धर्मीय हे सर्व बाबतीत देश सेवेसाठी मग ते सैन्यात असो की कुठे सदैव पुढे असतात , त्यांच्या प्रमाणे सर्वांनी पुढे यायची हीच खरी वेळ आहे……बरोबर 100 वर्षांनी अशी महामारी येत आली आहे , ती आपल्याकडे मग वर्षांपासून आली आहे ,आत्ता हीच खरी पुढे येण्याची वेळ आहे.असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात मंगेश माधवराव पाटील
माजी नगराध्यक्ष यांनी म्हटले आहे.
