वारीतील गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ; सामाजिक बांधिलकी : टेके पाटील ट्रस्टचा शैक्षणिक उपक्रम…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील वारी येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राहुल ( दादा) मधुकरराव टेके पाटील चँरिटेबल ट्रस्टच्यावतीने वारीतील श्री. रामेश्वर विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसाट वस्ती जिल्हा परिषद शाळा व साकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, या चार शाळेतील २०० पेक्षा अधिक गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शब्दबाग उजळणी पुस्तिका व वह्या या शैक्षणिक साहित्यांचे बुधवारी ( दि.६ ) वाटप करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे जेष्ठ मार्गदर्शक नरेंद्र ललवाणी म्हणाले, ग्रामीण भागातील विधार्थ्याना शिक्षण घेताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शिक्षण घेण्याची इच्छा असताना देखील कुटुंबाच्या खालावलेल्या आर्थिक परीस्थिमुळे पालकांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा भागविताना कसरत होते. त्यातून कधी कधी अश्या मुलावर अन्याय होतो. त्यामुळे वारी परिसरातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी टेके पाटील ट्रस्टच्या वतीने खारीचा वाटा म्हणून आम्ही हा शैक्षणिक उपक्रम राबवीत आहोत. जेणेकरून गरजू विद्यार्थ्याना शिक्षणाची गोडी निर्माण होऊन त्यांचे आयुष्यमान उचविन्यासाठी आमचे प्रयत्न कायम सुरु राहतील.
ट्रस्टचे समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र जाधव म्हणाले, आमचे मार्गदर्शक दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा टेके पाटील यांचे सामाजिक कार्य खूप मोठे होते. तसेच शैक्षणिक उपक्रमात देखील त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा त्याच्याच विचारांचा वारसा आम्ही त्यांच्याच नावाने सुरु केलेल्या ट्रस्टमार्फत सुरु ठेवला आहे. त्यामुळे वारी परिसरातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्याना शक्य तेवढे शैक्षणीक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असणार आहोत.
यावेळी ट्रस्टचे जेष्ठ मार्गदर्शक नरेद्र ललवाणी, पंडित वीर, चंद्रकांत पाटील, ट्रस्टचे समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र जाधव, लोकमतचे उपसंपादक रोहित टेके, नरेश टेके, विकास गोर्डे, गोरख गोर्डे, विकी गोर्डे, सुकृत गोर्डे, भाऊसाहेब सोनवणे, ज्ञानेश्वर पठारे, एकनाथ जगताप, साईराज टेके, अनुराग टेके, अनिरुद्ध जाधव, वारी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण, साकरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा गोर्डे, बालसंस्कार केंद्राच्या मीरा जोशी, शिक्षक प्रमोद दारकुंडे, गोरक्षनाथ साबळे, भागा जाधव, गोविंदा पोरे, पांडुरंग खाडे यांच्यासह पा महिला पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटोओळी:-
वारीतील टेके पाटील ट्रस्टच्यावतीने गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *