
कोपरगाव प्रतिनिधी:-
एका सहज घटनेतून आईने , ज्येष्ठ वयातील आनंदाची संकल्पनाच माझ्या हाती ठेवली . नव्या पिढीची गती पाहून आता आपली ही कुवत उरली नाही , म्हणून अगतिक होणारी कुरकुरणारी मन परस्परांच्या आनंदावर ढग आणतात … केव्हातरी परमेश्वराच्या स्मरणाने कृतज्ञ वृत्ताने आयुष्याकडे पहा केवढातरी जीवनसंघर्ष पचवून उठाता आपण सुबक वळणावर आलो आहोत … पंचविशीचे पंच पंच्याहत्तरीला लावण्याचं नाटक फार काळ करता येत नाही … त्याहून तारुण्याकडून अधिक प्रगल्भ तारुण्याकडे निघालेलं ज्येष्ठय पण जर समजूतदार झालं तर उपेक्षेचे विचार मनात आणणारी नवी पिढीही आपोआपच अंतर्मुखच होऊ शकेल … दात होते तेव्हा चणे नव्हते , अाता चणे आहेत तर दात नाहीत अशा उसाशांपेक्षा दात नाहीत.पण रव्याची पेज तर आहे . बदाम पचत नाहीत.पण मऊ भात मायेनं देणारी लेक – जावई , मुलगा – सून तर आहे . असा विचार केला तर …। खूप दु:खी होऊनही आता जे परत येणारच नाही . अशा सुखाचा विचार आपण का करतो ? त्यापेक्षा गॅलरीत फडफडत येणार्या पाकोळीच्या पंखांनीही सारी फुलबाग चुंळून घेता येते असा विचार केला तर …. तर त्यांचे उत्सवही तुमचे उत्सव होतील..!!

सुलेखन- गोरेसर:-
9850613612
