
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावच्या स्व.शंकररावजी कोल्हे संजीवनी साखर कारखाना यांच्या वतीने बायो प्रोडक्ट म्हणून (सी.एन.जी) गॅस चे दररोज दहा ते बारा टन उत्पादन होते व वितरित केले जाते.
आजच्या जगातील युद्धजन्य परिस्थितीत या गोष्टीला अनन्य साधारण महत्व आहे. संजीवनी कारखान्यातर्फे होणाऱ्या या गॅस चे वितरण मोठमोठ्या तेल कंपन्या द्वारे पेट्रोल पंपाला करण्यात येते. रोज अडीच ते तीन हजार गाड्यांना हा सी.एन.जी गॅस उपलब्ध होतो. योग्य वेळी योग्य निर्णय असे धोरण आखणाऱ्या श्री.विवेक भैय्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. या गॅस च्या किमतीपेक्षा आजच्या परिस्थितीत त्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. पाईप द्वारे होणाऱ्या एल.पी.जी गॅस च्या ऐवजी हा सी.एन.जी गॅस सुद्धा देता येईल असे प्रतिपादन एका मुलाखतीत विवेक भैय्या कोल्हे यांनी केले.
भारतातील सहकारी साखर कारखाने आजही अशा प्रकारचे सीएनजी उत्पादनात मागे आहे. संजीवनी कारखान्याचा हा उद्योग बाकीच्या कारखान्यांना दीपस्तंभ सारखा आहे. सर्वच कारखान्यांनी असे उत्पादन केल्यास मोठमोठ्या राष्ट्रांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.बिपिन दादा कोल्हे व माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे यांनी या क्षेत्रात दिलेले योगदान यापूर्वी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी अधोरेखित केले आहे.
कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातून राष्ट्राला होणारी मदत ही भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या नजरेत आली आहे.
“आत्मनिर्भर भारत” पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे स्वप्न कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातून पूर्ण होत आहे त्याचा कोपरगावकर यांना आनंद व अभिमान आहे पुन्हा एकदा युवा नेते युवक भैया कोल्हे यांचे अभिनंदन….!
नारायणशेठ अग्रवाल,कोपरगाव.
मो.9822630330
