
कोपरगाव प्रतिनिधी:-
राजगिरा लाडू तस पाहिल तर सर्वसामान्य व सर्वमान्य खाद्य वस्तू लहान मुलांपासून वृद्ध माणसाला राजगिरा लाडू खायला आवडतो. त्यामुळे त्याची मागणी ही जास्त असते. उपवास असल्यास घरो-घरी राजगिरा लाडूचा खप वाढतो. नेमके हीच बाजू हेरुन चाणक्य व हुशार रोहित काले यांनी सुरुवातीला लहान प्रमाणात राजगिरालाडू चे उत्पादन चालू केले. उत्पादन वितरण सर्व व्यवस्था ते एकटेच पहात, कालांश लाडूचे थेट ग्राहकांच्या दारी उत्पादन देण्यात यशस्वी झाले राजगिरा लाडू अधिक गुळ आरोग्यसाठी कसे उपयोगी व आयुर्वेदात त्याचे काय महत्त्व आहे हे श्री.रोहित काले यांनी वेळोवेळी प्रसार माध्यमातून जनतेला समजावून सांगितले. परिणामी हळू-हळू कालांश राजगिराची चव दर्जा लोकांना आवडू लागला,मग त्यांनी आपले उत्पादन वाढवले त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू.विनय काले यांनी सुद्धा खूप परिश्रम घेतले. मग त्यांनी पाठीमागे वळून पहिलेच नाही एखाद्या कसलेल्या उद्योगपतीप्रमाणे त्यांनी उत्पादन वितरण व्यवस्था तयार केली आज 150 ते 170 महिला व पुरुषांना रोजगार उत्पन्न करून दिला. यामुळे महिला बचत गटा तर्फे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सुद्धा रोहित काले चे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहे….!
आज उभ्या महाराष्ट्रात 50 टक्के बाजारपेठ कलांश राजगिरा लाडू व चिक्की या उत्पादनाने व्यापली आहे. कोपरगावकरांना सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे. नवभारत टाइम्स सुनंदाताई पवार फाउंडेशन,व्यापारी महासंघ विविध महाविद्यालय व विद्यालय यांनी या उपक्रमाचे स्वागत करून रोहित काले यांचा गौरव केला आहे.
नव उद्योजकांना मार्गदर्शन व दिशा देऊन नवीन उद्योजक तयार करण्याचे प्रयत्न व मोठे कार्य करावे, ही अपेक्षा पुनच्छ एकदा रोहित काले यांचे अभिनंदन…!
