मोबाईल वापरून नव्हे तर पुस्तके वाचूनच आपण यशस्वी व्हाल :- उषाताई पवार….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी: येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे ७७ वा प्रजासताक दिन उत्साहात संपन्न झाला. ध्वजारोहण राज्य सेवा राजपत्रित अधिकारी उषाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे, उपाध्यक्ष किरण भोईर, कार्यकारी संचालक विशाल झावरे, सदस्य पोपट झुरळे,शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे,ॲड.शंकर यादव,माजी नगरसेविका वर्षाताई शिंगाडे,संजय भोईर, दिलीप सोनवणे, दिलीप आरगडे, विकास शर्मा,इरफान शेख,राहुल देशपांडे,मधु पवार, योगेश झांबरे, चेतन भास्कर,सचिन मोरे व शाळेचे माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

पाहुण्यांचा परिचय शाळेच्या शिक्षिका चैताली पुंडे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या सुरवातीला संत ज्ञानेश्वर माऊली, भारत माता,सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या उषाताई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तालुकास्तरीय व शालेय गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा उषाताई पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तसेच इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर केली. मोबाईल वापरून नव्हे तर पुस्तके वाचूनच तुम्ही यशस्वी व्हाल अभ्यास करताना तुमच्या डेस्कवर मोबाईल नव्हे तर पुस्तक हवेत. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना योग्य नियोजन करावे. आपली परिस्थिती कशीही असो त्यावर रडत न बसता आपण स्वतः कष्ट करून आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे. राजेंद्र झावरे हे नगराध्यक्ष असताना एम के आढाव या शाळेची गुणवत्ता अतिशय चांगली होती व माझं शिक्षण देखील त्याच शाळेत झाले.राजेंद्र झावरे हेच माझे प्रेरणास्थान असून आज त्यांच्या शाळेत मला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच माझी आई नगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी होती व भाऊ बूट पॉलिश करून माझ्या शिक्षणासाठी हातभार लावत असे. आर्थिक परिस्थिती नसताना देखील आत्मविश्वास, योग्य नियोजन व जिद्दीच्या जोरावर मी यशस्वी झाले असे मोलाचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या उषाताई पवार यांनी विद्यार्थ्यांना केले. सर्व पालकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले व मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षिका ऋतुजा कुलकर्णी व पूनम सूर्यवंशी यांनी केले.शिक्षिका योगिता जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *