डॉ. श्वेता गाढवे एम. एस. जनरल सर्जनपरीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव येथील डॉ. श्वेता चंद्रकांत गाढवे यांनी जळगांव येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधून एम. एस. जनरल सर्जन (सामान्य शल्यचिकित्सक) परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. कोपरगांव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांच्या त्या कन्या आहेत.
डॉ. श्वेता गाढवे यांनी कोपरगांव येथील सेवानिकेतन स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सदगुरु गंगागिरी महाराज महाविद्यालयातून पूर्ण केले. या दोन्हीही ठिकाणी त्यांनी प्रथम श्रेणीतील प्राविण्य मिळविलेले आहे. येथील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जळगांव केथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये एम. बी. बी. एस. व एम. एस. हे वैद्यकीय पदवी शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. नुकत्याच झालेल्या एम. एस. जनरल सर्जन परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.

डॉ. श्वेता गाढवे यांच्या या यशाबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ. राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांच्यासह विविध स्तरातून अनेकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *