
कोपरगाव प्रतिनिधी:-
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगवंता परजणे उर्फ बापू यांची बिनविरोध निवड झाली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी त्यांचा सत्कार केला. मावळते उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांचाही यावेळी सत्कार करण्यांत आला.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अहिल्यानगरचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) संजय गोंदे सहायक उमेश कुलकर्णी यांनी काम पाहिले. श्री. ज्ञानेश्वर परजणे यांच्या नावाची सुचना राजेंद्र कोळपे यांनी केली तर त्यास संचालक बाळासाहेब वक्ते यांनी अनुमोदन दिले.
सत्कारास उत्तर देतांना मावळते उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी साखर कारखानदारीत सातत्यांने नविन तंत्रज्ञानाचा ध्यास घेत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा नांवलौकीक वाढविला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी देशात सर्वप्रथम उसाच्या रसापासुन थेट इथेनॉल निर्माती, बायो सीएनजी, पोटॅश खत निर्मातीतुन या कारखान्याची वेगळी ओळख बनविली., उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी त्यांच्यामुळेच मिळाली. नवनिर्वाचित उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे बोलतांना म्हणांले की, कारखान्याचे आधारस्तंभ तसेच संचालक मंडळाने उपाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी दिली ती पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेवु. प्रास्तविक संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले.
याप्रसंगी माजी उपाध्यक्ष अरूणराव येवले, शिवाजीराव वक्ते, शरदराव थोरात, केशवराव भवर, नानासाहेब गव्हाणे, मच्छिंद्र केकाण, संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, आप्पासाहेब दवंगे, मनेष गाडे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, रमेश घोडेराव, सौ. उषाताई संजय औताडे, सौ. सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, कार्यकारी संचालक सुहास यादव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव विधीज्ञ तुळशीराम कानवडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ आगवण, बापूतात्या परजणे, विविध संस्थांचे आजी माजी संचालक, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, तसेच शिंगणापुर, करंजी, संवत्सर, कोपरगांव, शिर्डी, राहाता पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते. शेवटी माजी संचालक फकिरराव बोरनारे यांनी आभार मानले.
