के.जे. सोमैया महाविद्यालयात वृक्षारोपण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम व स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने मार्गदर्शन सत्र संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. सुहास जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. मार्गदर्शन सत्रात मुख्याधिकारी मा. सुहास जगताप यांनी स्पर्धा परीक्षा व महाविद्यालयीन विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की ‘ज्याला आयुष्याच्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचा आहे त्यानेच स्पर्धा परीक्षेच्या वाट्याला जावं. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय कोणताही पर्याय नाही. महाविद्यालयात अभ्यास करतांना आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवून सातत्यपूर्वक अभ्यास म्हणजे यशस्वी जीवनाची हमी होय. असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे हे उपस्थित होते. वृक्षारोपण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड, डॉ. संजय दवंगे, स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ. वसुदेव साळुंके, डॉ. शैलेंद्र बनसोडे, डॉ.अभिजित नाईकवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व स्पर्धा परीक्षा विभागाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *