अनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी सकाळपासूनच रस्त्यावर उतरलेले पहावयास मिळले.


तहसिलदार योगेश चंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,महसुलचे जयवंत भांगरे, शहर पोलीस स्टेशनचे राम खारतोडे,बाबासाहेब कोरेकर,सुरज अग्रवाल,प्रकाश नवाळी,संभाजी शिंदे, राजेंद्र कांबळे,गर्जे,नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरण यासह पोलीस स्टेशनचे कर्मचारी, कोपरगाव नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
कोपरगाव शहर व ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिक शासनाने दिलेल्या निर्धारित वेळेत बाहेर पडतात अशावेळी अनेक खरेदी विक्री केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता असते. प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची कोरोनाचे पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरत शहरात ठिकठिकाणी संयुक्तपणे भेटी दिल्या आहेत.
कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे वतीने दुचाकी वाहनावर एकापेक्षा जास्त प्रवास करणारे,कोरोना निर्मुलनासाठी घालून दिलेले नियमांचे उल्लंघन करणारे यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे.तसेच नियमितपणे मास्क, सॅनेटायझरचा वापर करावा.प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *