लोक सहभागातून ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचा विषय थांबविलेला आहे:- विजय वहाडणे, काका कोयटे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात लोकसहभागातून एक ऑक्सिजन प्लान्ट ग्रामीण रुग्णालयात बसविण्याबाबत चर्चा करण्यासाठी सहविचार सभा नुकतीच नगरपरिषदेत पार पडली होती. ऑक्सिजनचा झालेला प्रचंड तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असेच सर्वांनी यावेळी मांडले होते. कारण ऑक्सिजनअभावी होत असलेले मृत्यु रोखणे महत्वाचे आहे. 50 ते 60 लाख रू. गुंतवणूक करून ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यासाठी आर्थिक भार उचलण्याचे अनेकांनी मान्यही केले. पण त्यानंतर श्री.अरविंदशेठ भन्साळी, राजेशजी ठोळे, काकासाहेब कोयटे यांनी अनेक राज्यातील “ऑक्सिजन प्लान्ट” निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क केला असता अजून किमान चार महिने तरी ऑक्सिजन प्लान्ट उभारून देता येणार नाही, कारण सर्व देशभरातूनच अशा प्लान्टला प्रचंड मागणी आहे असेच सांगण्यात आले. आमदार श्री.आशुतोषजी काळे यांनीही एका नविन ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याची ऑर्डर दिल्याचे सांगितले. तो उभारल्यानंतर येणाऱ्या काळात ऑक्सिजनची सोय होणार आहे. त्यामुळे सध्या तरी लोकसहभागातून ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचा विषय थांबविलेला आहे.
विजय वहाडणे,
काका कोयटे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *