
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात २८फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.मकरंद कोऱ्हाळकर यांच्या हस्ते “मला उत्तर हवे” या विज्ञान जिज्ञासा प्रश्नपेटीचे उदघाटन करण्यात आले. पर्यवेक्षक श्री.गायकवाड आर. बी. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन विज्ञान शिक्षिका सौ.श्वेता मालपुरे यांनी केले. विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांचा जीवनपट, दैनंदिन जीवनातील विज्ञान, अंधश्रद्धा निर्मूलन , विज्ञान कथा, शाश्वत विकासाची उद्दिष्टे अशा विविध विषयावर या प्रसंगी मनोगत व्यक्त केले गेले.जेष्ठविज्ञान शिक्षक श्री. कुलदीप गोसावी यांनी विज्ञान प्रश्नमंजुषा घेतली. त्यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.विजेत्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोपरगाव नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. वसंतराव ठोंबरे यांच्या हस्ते प्रश्नमंजुषा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. डी.व्ही तूपसैंदर व यु.एस. रायते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सौ. गायकवाड ए.जी. यांच्या विज्ञान गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ए.बी.अमृतकर, श्री.ए.जे.कोताडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कोविड१९च्या निर्बंधानंतर खूप दिवसांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता आल्याचे समाधानकारक हास्य विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.या कार्यक्रमा सोशल डीस्टंस पाळुन शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्तानं सर्वाना शुभेच्छा दिल्या .
