के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात जिमखाना विभागाच्या वतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. सी. ठाणगे यांचे शुभहस्ते स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच क्रीडा साहित्याचे पूजन करून मेजर ध्यानचंद यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकण्यात आला.


या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, उपप्राचार्य प्रा.बी.आर सोनवणे, जिमखाना समिती चेअरमन प्रो.जे एस.मोरे, रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे आदी मान्यवरांनी उपस्थित खेळाडू व क्रीडाप्रेमींना शुभेच्छा देऊन मेजर ध्यानचंद यांचे योगदान अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.व्हि.एस. साळुंके, डॉ. डी. एस. बुधवंत, प्रा. ए. जी. वाघ यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक श्री. एम. व्हि. कांबळे यांनी केले तर डॉ. व्ही. एस. साळुंके यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्या खेळाडू विद्यार्थिनी-उपस्थिती दर्शविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *