
कोपरगाव प्रतिनिधी:-
शनिवार दि.8 मे व रविवार दि.9 मे रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत जीवनावश्यक बाबीबरोबरच किराणा व भाजीपाला-फळे विक्रीही सुरू रहाणार आहे.भाजीपाला-फळे विक्री फक्त बाजार ओट्यावर-बाजारतळ येथेच करता येणार आहे.व्यवस्थित नियोजन व्हावे,रस्त्यात अडथळा होऊ नये,बेसुमार गर्दि होऊन कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्यच आहे.
शनिवारी व रविवारी सकाळी 7 वाजता आपण इंदिरा शॉपिंग जवळ एकत्र जमावे ही विनंती
त्याचप्रमाणे रविवार दि.9 मे दुपारी 3 ते शनिवार दि.15 मे सकाळी 7 पर्यंत जनता संचारबंदी यशस्वी करायची आहे.आपापल्या प्रभागात कुणीही रस्त्यावर येऊ नये,संचारबंदीचे नियम पाळावेत यासाठीही आपण प्रयत्न करावेत.कारण कोरोनाच्या संकटात रात्रंदिवस काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना आपल्या सहकार्याची गरज आहे.तसे केले तरच कोरोनाचा प्रभाव कमी करता येणार आहे.
विजय वहाडणे…
