कोपरगांव येथे ब्राह्यण समाजाच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्तानं पालखी व शोभा यात्रेचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
ब्राह्मण सभा कोपरगावच्या वतीने सालाबाद प्रमाणे भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहाने पार पडला.
भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा निमित्तानं कोपरगांव शहरात सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन भव्य दिव्य व फटाक्याच्या आतिषबाजी करुन करण्यात आले.या मध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रारंभी ब्राह्यण सभेच्या मंगल कार्यालयात जेष्ठ विधिज्ञ जयंतराव जोशी,ब्राह्यण सभेचे अध्यक्ष श्री.मकरंद को-हाळकर,शैलैंद्र कुलकर्णी
अजित कुलकर्णी,सुनिल गोखले,ललित ठोंबरे,अतुल शालीग्राम,प्रशांत जोशी ज्ञानेश्वर कुलकर्णी
यांचे हस्ते भगवान परशूरामाचे पादयपुजन महापुजा विधीवत करण्यात आली या प्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, बांधकाम समिती प्रमुख प्रसाद नाईक उपस्थित होते.


सायंकाळी शोभायात्रेचे सुरुवातीला भगवान परशुरामाचे विधिवत पुजन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,युवा नेते विवेकभैय्या बिपिनराव कोल्हे यांचे शुभहस्ते झाले.त्यांनी भगवान परशुराम जयंती आणि अक्षय्य तृतीया निमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या.


पुढील पिढीपर्यंत आपल्या परंपरा आणि संस्कृती पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने या उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा असे मत व्यक्त केले.या प्रसंगी नगराध्यक्ष श्री. पराग संधान, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक तसेच, श्री. प्रसाद आढाव (गटनेते), माजी नगराध्यक्ष श्री. संजय सातभाई, श्री. राजेंद्र सोनवणे, नगरसेवक श्री. स्वप्नील मंजुळ, श्री. कलविंदर डडीयाल, श्री. कालुआप्पा आव्हाड, श्री. अतुल काले, डॉ. अमोल अजमेरे, श्री. विक्रमादित्य सातभाई, श्री. योगेश बागुल, श्री. संतोष शिंदे, श्री. रविनाना कथले, श्री. वैभव गिरमे, श्री. सोमनाथ म्हस्के, श्री. सनी वाघ, श्री. संतोष गंगवाल,श्री. पप्पु पडीयार, आदी मान्यवर उपस्थित होते.


सर्वाचे स्वागत ब्राह्यण सभेचे सचिव श्री.सचिन महाजन यांनी केले. या कार्यक्रमाचे पौरोहीत्य वेदशात्र संपन्न वैभव जोशी व त्यांच्या सहकारी यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.
या शोभायात्रेत समाजबांधव सुनिल गोखले यांनी भगवान परशुराम यांची सादर केलेली वेषभुजा खुप भावुन गेली ग्रामदैवत रेणुका माता देवीच्या मंदीरा मध्ये विनित वाडेकर यांच्या हस्ते रेणुका मातेची व भगवान परशूरामाची आरती करण्यात आली.
या शोभायात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. शोभा यात्रेचा समारोप करतांना नगराध्यक्ष श्री. पराग संधान या‌ंचे हस्ते भगवान परशुरामाची आरती करण्यात आली.
या शोभायात्रेचे राष्ट्रवादी कांँग्रेस पार्टीचे संदीप वर्प,विनायक गायकवाड, सुशांत घोडके, विजय जोशी,जेष्ठ पत्रकार मनोज जोशी आदि मान्यवरांनी भगवान परशुराम पालखीचे स्वागत केले.
ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष श्री.बी.डी.कुलकर्णी यांनी आभार मानले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन खजिनदार जयेश बडवे यांनी केले.तर शोभा यात्रेचे संयोजन श्री.संजीव देशपांडे व संघटक श्री.महेंद्र कुलकर्णी, संदीप देशपांडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.वसंतराव ठोंबरे,डाॕ.मिलींद धारणगांवकर,अजिंक्य पदे,गौरीश लव्हरीकर,योगेश कुलकर्णी ,सदाशिव धारणगांवकर,सौ. वंदना चिकटे, आदि पदाधिकारी समाज बांधव यांनी विशेष प्रयत्न केले.या शोभायात्रेत बहुसंख्य पुरुषांनीभगव्या टोप्या परीधान केल्या असल्याने सगळे वातावरण भगवेमय झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *