
कोपरगाव प्रतिनिधी:-
मराठा आरक्षणासाठी गेले ३० वर्षे महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा समाज लढत आहे. १९८२ ला स्व. अण्णासाहेब पाटलांनी पाहिलं बलिदान दिलं आणि आजवर आमच्या ५० पेक्षा जास्त मराठा बांधवांनी सरकारला जागं करण्यासाठी हसत हसत समाजासाठी आपला जीव दिला.
हे सर्व घडत असताना आम्ही मराठे जगाला आदर्श वाटावा असे लाखोंचे मूक मोर्चे अगदी शांततेत काढत होतो. ५८ मूक मोर्चे झाल्यावर मायबाप सरकारला जाग आली आणि मराठा समाजाला १६% आरक्षण देण्याचा कायदा झाला. आमचे समाजबांधव आनंदात होते . विद्यार्थी मोठ्या जोमानं अभ्यास करून अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत होते . कालांतराने याच आरक्षणाला मुंबई उच्च न्यालायत आव्हान देण्यात आलं ते आम्ही स्वीकारून न्यायालयीन लढाईत जिंकलो सुद्धा परंतु खरी कसोटी सुप्रीम कोर्टात लागली . खरं तर सरकारला हे माहिती होतं की १०२ व्या घटना दुरुस्ती नुसार राज्य मागासवर्ग आयोगाला कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायची शिफारस करता येनार नाही आणि राज्य शासनाने त्याच आयोगाला प्रमाण मानून आणि एकट्या आयोगाच्या अहवालाला घेऊन कायदा आणला आणि महाराष्ट्राचं भाग्य की सर्व पक्ष एकत्र येऊन कायदा मंजूर झाला. परंतु सुप्रीम कोर्टाने १०२ व्या घटना दुरुस्ती बाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग केलं. आज सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाचा( राज्य मागासवर्ग आयोग) अहवाल ग्राह्य न धरता आरक्षणाला रद्दबातल ठरवलं. परंतु यातील एक सकारात्मक बाब म्हणजे या आयोगाच्या काही शिफारसी ग्राह्य धरून मेडिकल च्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला, हा एक आशेचा किरण आहे म्हणजेच आपण अजूनही या मुद्यावरून पुन्हा वरिष्ठ बेंच कडे जाऊ शकतो असे अनेक वरिष्ठ विधिज्ञ सांगत आहेत.
हे सर्व आज घडत असताना आज मराठा समाजातील अनेक तरुण अनेक शासकीय खात्यांमध्ये नियुक्ती च्या प्रतीक्षेत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि भरतीवर सुद्धा टांगती तलवार आहे अशा परिस्थितीत राज्य शासन आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन अगदी २४ तासांत आपली भूमिका स्पष्ट करून मराठा तरुणांना दिलासा द्यावा ही राज्यकर्त्यांना नम्र विनंती असेल.
आज कोविड चं महाभयंकर संकट आपल्यावर असताना हा दुर्दैवी निर्णय मा. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या बेंच ने दिलाय या बाबत अनेक उद्विग्न प्रतिक्रिया येत असतानाच छत्रपती खा. संभाजी महाराज भोसले यांनी सकाळीच स्पष्ट केलं की ” उद्रेक हा शब्द सुद्धा मनात आणू नका” आपणाला छत्रपती महाराजांचा शब्द प्रमाण मानून सध्या तरी कायदेशीर पद्धतीने पुढे जावं लागेल.
आत्ता निराश होऊन चालणार नाही , पुढे सुप्रीम कोर्टाची वरिष्ठ बेंच , घटना दुरुस्ती किंवा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश असे अनेक पर्याय आहेत आणि त्यावर आपले विधिज्ञ आणि राज्यकर्ते नक्कीच प्रचंड मेहनत घेतील असा आशावाद ठेऊयात .
मराठा अरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवाना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली .
हार स्वीकारणं आपल्या रक्तात नाही . निराश हेऊ नका आपण सर्व घटकांना सोबत घेऊन हा आरक्षणाचा लढा सुरू ठेऊ. असे सुमित नितीनराव कोल्हे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
