
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील सुप्रसिद्ध किराणा व्यापारी श्रीचंद दिवानचंद होडे यांना व्यापारी महासंघाचा “जीवनगौरव पुरस्कार” मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…!
कोपरगावातले नावाजलेले जुने किराणा व्यापारी श्रीचंद दिवानचंद होडे यांचे एसटी स्टँड परिसरात आपले लहानसे किराणा दुकान चालवायचे त्यांचे वडील स्व.दिवानचंद (चाचा) हे त्या काळातील सर्वसामान्यांमध्ये व गोर-गरिब लोकांमध्ये लोकप्रिय होते.
1947 च्या भारताच्या फाळणीमध्ये आठ वर्षाचे असताना ते कोपरगावात आले बस स्टँड समोर 1958 मध्ये प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अशोक किराणा स्टोअर हे दुकान चालू केले.
दोन-चार रुपयाचा किराणा घ्यायचा म्हणजे होडे यांचे दुकान लोकांना जवळचे वाटायचे.
आमची एस.टी स्टँड मध्ये कॅन्टींग असताना त्यांचा आमचा जवळचा संबंध आला. त्या काळातील प्रसिद्ध असलेली ( सिंधी चाळ ) कापड दुकानदार येथे राजस्थान स्वीट मार्ट आहे या ठिकाणी होडे बंधूंचे किराणा दुकान त्या काळात प्रसिद्ध होते.
आज श्रीचंदजी होडे कोपरगाव शहरात मोठे नामावंत किराणा दुकानदार समजले जाते. श्रीचंदजी होडे उत्कृष्ट बॅडमिंटन पट्टू होते. त्या काळात स्व.नारायणजी दारुणकर व इतर सहकारी रोज बॅडमिंटन खेळत त्यांना बॅडमिंटन खेळात अनेक पारितोषिक मिळाली. स्लो स्लाइकलिंग हा त्यांचा आवडता खेळ होता काँग्रेस सेवा दलातर्फे झालेल्या स्लो स्लाइकलिंग स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले हे पारितोषिक माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले याचा त्यांना अभिमान आहे.
त्या काळात *जावा *मोटरसायकलीवर मुंबई,बारामती येथे लॉंग ड्राईव्ह करण्याचा त्यांना छंद होता.* 2018 साली किराणा मर्चंट असोसिएशन तर्फे त्यांना किराणा भूषण हे पारितोषिक श्री.राजेशजी मालपाणी यांच्या हस्ते देण्यात आला होता.
असे हर-हुनरी श्रीचंदजी होडे या योग्य माणसाला व्यापार भूषण पुरस्कार मिळाला असे म्हणले अतिशयोक्ती होणार नाही.
श्रीचंद होडे यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना पुन्च्छ एकदा अभिनंदन….!
