
कोपरगाव प्रतिनिधी:-
होळी सणापासून ते हनुमान जन्मोत्सव पर्यंत कोपरगाव माहेश्वरी समाजाच्या वतीने 13 वर्षापासून हनुमान चालीसाचे संगीतमय पठण केले जाते. ज्या समाज बांधवांची इच्छा असेल त्यांच्या घरी जाऊन हनुमान चालीसा पठण केले जाते. या दिवसात समाजात भक्तिमय वातावरण तयार होते,आजकाल तरुण वर्गात कमी होत चाललेले देवाविषयी भक्ती या हनुमान चालीसा मुळे नक्कीच वाढीस लागेल.
हनुमान चालीसा वाचन केल्यामुळे काय फायदे होतात हे बघू,
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन-कुमार ।
बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार ॥
या दोह्याचा अर्थ-हनुमान चालीसा पठण केल्यामुळे बुद्धी,विद्या,बल सर्वात वाढ होते.
विद्यार्थी व तरुण वर्गाला याचा खूप फायदा होतो.
भूत पिसाच निकट नहिं आवै ।
महाबीर जब नाम सुनावै ॥
यात याचा अर्थ-हनुमान चालीसा पठण केल्यामुळे भूत पिसाच अघोरी शक्ती नकारात्मकता वगैरे जाऊन आत्मविश्वास वाढतो.
संकट कटै मिटै सब पीरा ।
जो सुमिरे हनुमत बलबीरा ॥
याचा अर्थ- हनुमान चालीसा पठण मुळे जीवनात येणारे संकट पिडा सर्व दूर होऊन आनंदी आनंद होतो.
जो सत बार पाठ कर कोई ।
छूटहि बन्दि महा सुख होई ॥
संत कबीरदास रचित या हनुमान चालीसाचे शंभर वेळा पठण केल्यास सर्व सुख प्राप्त होऊन स्वर्गलोक प्राप्त होत.
अशा प्रकारे हनुमान चालीसाच्या सामुदायिक वाचनामुळे अत्यंत चमत्कारी व भाग्यशाली जीवनातील प्रत्येक समस्याचे समाधान होते. ज्या घरामध्ये नित्य हनुमान चालीसा पाठ होते. त्या घरामध्ये दुःख दारिद्र्य आरोग्य अकाल मृत्यू दुर्घटना मानसिक त्रास कमी होतो.हनुमान चालीसा पठणामुळे राहू व शनी यांचा त्रास नक्कीच कमी होतो सकारात्मकता व भयमुक्ती वातावरण तयार होते. हनुमानाची शक्ती व आपली भक्ती एकत्र आल्यास सर्व प्रकारच्या दुःख दूर होऊन भारत वर्षात सुख समाधान मिळेल असा आत्मविश्वास मला वाटतो*
अशाप्रकारे कोपरगाव माहेश्वरी समाजाने सामुदायिक हनुमान चालीसा पठण घेऊन कोपरगाव शहरात धार्मिक वातावरण तयार करण्यात यशस्वी झाला आहे. कोणाचाही नाव उल्लेख न करता सर्व समाज बांधवांचे हार्दिक अभिनंदन..!
नारायणशेठ अग्रवाल, कोपरगांव
मो-9822630330
