
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव तालुक्यात महापूर, दुष्काळ,चारा पाणी टंचाई असो की सध्या रौद्र रूप धारण केलेला करोना चा उद्रेक असो ज्या ज्या वेळी तालुक्यातील जनता संकटात असते त्या त्या वेळी कोपरगाव तालुक्यात काळे,कोल्हे कुटुंबीय नागरिकांच्या हाकेला देवदूत म्हणून धावून येतात
सुमारे चाळीस वर्षांपासून कोपरगाव शहराच्या सामाजिक,सांस्कृतिक राजकीय जडणघडणीत काळे कोल्हे कुटुंबियांचे मोठे योगदान आहे हे विसरून चालणार नाहीच
राजकारणाच्या वेळी राजकारण करायचे यांच्या राजकीय डावपेचाची नोंद जिल्ह्यातच नाही तर राज्यात प्रसिद्ध आहे पण राजकारण करत असताना सामाजिक दातृत्व देखील विसरून चालणार नाही हे मात्र नक्कीच
जेष्ठ नेते कै शंकरराव जी काळे साहेब व जेष्ठ नेते शंकररावजी कोल्हे साहेब यांनी घालून दिलेली वैचारिक जबाबदारी आज त्यांची तिसरी पिढि समर्थपणे पेलत आहे
दुष्काळी परिस्थिती चाराटंचाई असताना चारा छावण्या असो की वाडीवस्तीवर टँकर देण्याचा निर्णय असो , महापुराच्या वेळी पुरग्रस्तांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था कपडे जीवनावश्यक वस्तू आदी देऊन केलेली मदत कोणीच विसरू शकत नाही
माजी आ अशोकराव काळे, बीपीनराव कोल्हे यांच्या नंतर आ आशुतोष काळे व युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांनी कोविड साथीच्या आजारात पुन्हा हे सिद्ध केले
माजी आ स्नेहलता ताई कोल्हे यांनी प्रशासनाला धारेवर धरून ठेवण्याची जबाबदारी घेतली असून
आ काळे यांनी ग्रामीण रुग्णालय ,एस एस जी एम महाविद्यालय व महात्मा गांधी ट्रस्ट येथे कोविड सेंटरची उभारणी केली तर जिल्हा बँकेचे सदस्य विवेक भैय्या यांनी आत्मा मलिक वसतिगृहात कोविड सेंटर सुरु केले
औषधें ऑक्सिजन,बेड कोविड सेंटरची उभारणी आंबूलन्स आदी मागणी करून हे लाखाचे पोशिंदें तालुक्यातील जनतेला जगविण्या साठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत औषधांची जुळवा जुळव,प्रशासन व जनतेच्या अडचणी या मध्ये दुवा म्हणून काम करत असताना हे देवदूत आपल्या जीवपेक्षा तालुक्यातील जनतेची दिवसरात्र काळजी करत आहेत वेळ प्रसंगी रात्री अपरात्री कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत आवश्यक त्या सूचना करून कधी धारेवर धरून तर एखाद्या कार्यकर्त्याला फोनवर चर्चा करत आहेत
अजूनही काही ठिकाणी सुविधा कमी आहेत
पण तुमच्या मेहनत व जिद्दीचा लढा तसेच आश्वासक शब्द नक्कीच तालुक्याला, रुग्णांना दिलासा देईल यात शंका नाही असे असताना जनतेनेही थोडा संयम दाखवून आपली नैतिक जबाबदारी म्हणून या राष्ट्रीय आपत्तीत किमान प्रशासनाला सहकार्य करावे ही अपेक्षा त्यामुळेच तुमच्या सारख्या लाखोंच्या पोशिंद्यांच्या कार्य कर्तृत्वाला सलाम..!
अँड.नितीन पोळ
(लोक स्वराज्य आंदोलन)
9860733420
9175894420
