जेऊर पाटोदा येथील चंद्रलिलानगर येथे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव – शहरालगत असलेल्या जेऊर पाटोदा शिवारातील,’ चंद्रलिलानगर ‘ येथील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. दुरदुरचे भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत महिलांसाठी अनेकविविध कार्यक्रमाचे, स्पर्धांचे आयोजन केले जाते. महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. चंद्रलिला असोसिएटचे वतीने भरघोस बक्षिसे देण्यात येतात.
येथील उत्सवानिमित्त सकाळ संध्याकाळ आरती, प्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. म्हणून आकर्षण असते. दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे खंडित झालेला उत्सव यंदा उत्साहाने साजरा केला जातो आहे.मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. टिपर्या खेळण्यासाठी विश्रृत मैदानावर रोषणाई, सजावट केली आहे.
एकंदरीत यंदा सर्वत्रच नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी तयारी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *