के.जे.सोमैया महाविद्यालयात तीन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय येथे कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन व महाविद्यालयाच्या वतीने कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार कै. के. बी. रोहमारे (दादा) यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दि. 24 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली. या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, मा. रमेशराव रोहमारे, मा. राहुल रोहमारे, कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मा. संदिपराव रोहमारे, सचिव मा. सत्येन मुंदडा, मा. सुनिल बोरा, मा. सुरेश शिंदे, मा. दिनार कुदळे, मा. एस.पी.कुलकर्णी, मा.आजिनाथ ढाकणे, मा. अतुल शिंदे, मा. सागर रोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या बॅडमिंटन स्पर्धेसाठी राज्यभरातून विविध खेळाडू, मार्गदर्शक व क्रिडा रसिक उपस्थित होते. तीन दिवस खेळल्या गेलेल्या या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत राज्यभरातून अनेक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. ही स्पर्धा महिला (डबल), पुरुष ओपन (डबल), मिक्स डबल, 35 वयोगटावरील पुरुष (डबल) 15 वर्षाखालील वयोगट (मुले-मुली) आणि 19 वर्षाखालील वयोगट (मुले-मुली) अशा आठ गटात पार पडली. या स्पर्धेत 15 वर्षाखालील वयोगटातील 63 स्पर्धकांनी, 19 वर्षाखालील वयोगटातील 28 स्पर्धकांनी तर पुरूष दुहेरी, महिला दुहेरी व मिक्स डबल ग्रुप मध्ये 64 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. 35 वयोगटावरील पुरुष दुहेरी सामन्यात प्रथम पारितोषिक राकेश पठारे व नितीन गाढवे, द्वितीय पारितोषिक राहुल टेंभुरे व दिनेश अजापुजे तर तृतीय पारितोषिक रवी आढाव व ऋषिकेश बनकर यांनी पटकावले. पुरुष ओपन दुहेरी स्पर्धेत प्रथम पारितोषिक पुणे, द्वितीय पारितोषिक बार्शी तर तृतीय पारितोषिक बारामती या संघानी पटकावले. या स्पर्धेसाठी महिला डबल गटात बक्षीसे अनुक्रमे रूपये 5000, 3000, 2000 तर मिक्स डबल गटात बक्षीसे अनुक्रमे रूपये 7000, 5000, 2000 असे ठेवण्यात आले होते. पुरुष ओपन (डबल) गटात बक्षीसे अनुक्रमे रूपये 21000, 11000, 5000 तर 35 वयोगटातील पुरुष (डबल) बक्षीसे प्रथम 11000, द्वितीय 7000, तृतीय 3000 असे ठेवण्यात आलेले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रायोजकत्व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, गौतमनगर यांनी घेतले होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, गौतमनगर चे उपाध्यक्ष श्री. शंकरराव चव्हाण, मा. कृष्णा आढाव, कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मा. संदिपराव रोहमारे, सचिव मा.सत्येन मुंदडा, मा. सुनिल बोरा, मा. अनुप कातकाडे, मा.एस.पी.कुलकर्णी, मा.आजिनाथ ढाकणे, मा. अतुल शिंदे, मा. मनिष कोठार, मा. सागर रोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक प्राप्त सर्व विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या तीन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे यशस्वी आयोजन कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनील कुटे, क्रिडा शिक्षक मिलिंद कांबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे, रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे , किशोर गायकवाड तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *