पत्रकार सुध्दा कोरोना योध्देच आहेत:- नगराध्यक्ष विजय वहाडणे….

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव कोरोना महामारी सुरू झाल्यापासून व त्याआधीही जनतेला सर्व प्रकारच्या बातम्या “अपडेट” देत आहेत.रात्रंदिवस जीव धोक्यात घालून,अनेक वाईट प्रवृत्तीची पर्वा न करता त्यांचे काम सुरू असते.तेही खरे तर कोरोना योद्धेच आहेत.प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अत्यंत काटेकोर वस्तुस्थिती पत्रकारांमुळेच जनतेपर्यंत घरोघरी पोहोचते.कुठलेही सामाजिक दायित्व पार न पाडता जगातील प्रत्येक विषयांवर मत मांडणारे,सल्ला देणारे काही “निष्क्रिय व्हॉट्सऍप वीर” कोपरगावला लाभलेले आहेत.घरात बसून मोबाईलमधे बोटे घालणाऱ्यानी एकदा तरी पत्रकारांप्रमाणे प्रत्यक्ष अमरधाममध्ये जाऊन यावे.जनतेसमोर भीषण वास्तव मांडल्याने तरी गलथानपणा करणारे काहीजण शिस्तीत वागतील व कोरोनाच्या विरोधातील लढाईला बळच मिळेल.सर्व सन्माननीय पत्रकार बांधवानी या संकटात नेहमीप्रमाणेच कार्यरत रहावे हीच शहरातील सुज्ञ नागरिकांच्यावतीने नम्र विनंती व जाहीर आवाहन करत आहे.आजच माझे जेष्ठ पत्रकार मित्र अशोकराव तुपे (श्रीरामपूर)यांचे दुःखद निधन झाले,त्यांना विनम्र श्रद्धांजली….
—विजय वहाडणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *