
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव अर्थ संकल्पात अनुसूचित जाती जमातीच्या आर्थिक सामाजिक कल्याणसाठी व उन्नतीसाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था केली जाते मात्र तो निधी आता सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्या वर खर्च करावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे
मागील दिड वर्षांपासून देशभर करोना साथीच्या आजाराने कहर मांडला असून आता तर साथीच्या आजाराने रौद्र रूप धारण केले आहे गोरगरीब रुग्ण खर्च करण्याची ऐपत नसल्याने उपचारा अभावी मृत्यू मुखी पडत आहे ऑक्सिजन बेड व उपचाराचा खर्च करण्याची कोणतीच आर्थिक परिस्थिती या गोरगरीब जनतेची नाही
मागील एक वर्षांपासून अनुसूचित जातीच्या कोणत्याही कल्याणकारी निधीचा पाहिजे तसा खर्च झाला नाही
सन २०२१-२०२२ या वर्षासाठी सरकारचा अर्थ संकल्प जाहीर झालेला असून त्यात अनुसूचित जाती करिता लोक संख्येच्या प्रमाणात निधी मिळणे अपेक्षित होते मात्र तो देखील पूर्ण क्षमतेने दिला गेला नाही या उलट मागील वर्षी केंद्र सरकारने ४१ हजार कोटी रुपयांचा निधी अन्यत्र वळविला आहे
त्यामुळे या घटकांच्या विकासासाठी कागदावर निव्वळ घोषणा करून निधी अन्यत्र पळवला जातो अशा प्रकारे आनूसुचित जातीचा निधी अन्यत्र वळवून या घटकांवर सरकारने आधीच अन्याय केलेला आहे मात्र आता हा निधी या घटकातील नागरिकांना औषध ऑक्सिजन बेड व वैद्यकीय सुविधा देण्या साठी उपलब्ध करून द्यावा तसेच सर्व रुग्णांना रेमडीसीवर व ऑक्सिजन उपलब्ध करून घ्यावे तसेच या घटकातील रुग्णांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने औषधोपचारा अभवी कोणीही व्यक्ती वंचित राहू नये असे या पत्रकात म्हटले आहे.
