
दशक्रिया विधी ३ नोव्हेंबर 2024 रोजी…
कोपरगाव प्रतिनिधी :-
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील वैकुंठवासी हरिभक्त परायण व विजयी हनुमान प्रासादिक भजनी मंडळाचे सदस्य सुदाम रामराव भुजाडे पाटील यांना शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी देवाज्ञा झाली त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक 3 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ९:३० वाजता अमरधाम गोदावरी तिरी कोपरगाव येथे होणार आहे .सदर प्रसंगी हरिभक्त परायण गणपत महाराज लोहाटे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. सुदाम रामराव भुजाडे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते तसेच भजन, काकडा, हरिपाठ याची त्यांना आवड होती. त्यांचे २५ ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले असुन त्यांच्या पश्चात पत्नी ग.भा विमलबाई सुदाम भुजाडे, बहिण ग.भा. लक्ष्मीबाई भागिनाथ खरात, भाऊ शिवाजी रामराव भुजाडे , ३ मुले संजय सुदाम भुजाडे, राहुल सुदाम भुजाडे, प्रविण सुदाम भुजाडे , सुना सौ.मनिषा संजय भुजाडे, सौ.मंगल राहुल भुजाडे, सोनाली प्रविण भुजाडे, पुतण्या प्रसाद शिवाजी भुजाडे, नातू महेश भुजाडे , गणेश भुजाडे , नातं आराध्या भुजाडे, शितल भुजाडे, वैष्णवी भुजाडे, रेणूका जेऊघाले असा त्यांचा मागे मोठा परिवार आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली…

