मंजुर हंडेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी भास्करराव तिरसे तर उपाध्यक्षपदी राधाकृष्ण गवळी…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणा-या मंजुर हंडेवाडी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी श्री. भास्करराव तिरसे तर उपाध्यक्षपदी श्री राधाकृष्ण गवळी यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहायक निबंधक एन जी. ठोंबळ होते.
श्री. भास्करराव तिरसे यांच्या नावाची सुचना शिवाजीराव घुमरे यांनी तर रामनाथ भोसले यांनी अनुमोदन दिले. तर राधाकृष्ण गवळी यांच्या नावाची सुचना संभाजीराव गावंड यांनी तर किसनराव भोसले यांनी अनुमोदन दिले.
याप्रसंगी संचालक सर्वश्री एकनाथ गायखे, माधवराव गोसावी, साहेबराव तिरसे, चंद्रकांत पगारे, श्रीमती यशोदाबाई घुमरे, सौ शितल पायमोडे, आबासाहेब गावंड, भारत कापसे आदि उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यांत आला.
सत्कारास उत्तर देतांना श्री. भास्करराव तिरसे म्हणांले की, ग्रामिण अर्थकारणाला पाठबळ देण्यांसाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने काम केले तोच वसा घेवुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे हे काम करत असुन त्यांच्या मार्गदर्शनांखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक भैय्या कोल्हे कार्यरत आहेत. मंजुर हंडेवाडी सहकारी सोसायटी सभासदांच्या उत्कर्षासाठी जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांच्या माध्यमांतुन शासकीय निमशासकीय योजनांसाठी काम करू, सहकार टिकवण्यांसाठी सर्वांनी एकजुटींने काम करावे असे ते म्हणाले.
या निवडीबददल श्री. बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, श्री. विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिव आण्णासाहेब निकम यांनी केले तर शिवाजीराव घुमरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *