ताराबाई उर्फ ताई बाई ही हिराकनीच,नदीपात्रात वाहून जाणाऱ्या दोन युवकांचे वाचवले प्राणताराबाई ची साडी बनली जीवनाची दोरी:- मंगेश औताडेसंस्थापक अध्यक्ष एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यामध्ये मंजूर गावात नदीपात्रात टांगतोडे नामक तीन सख्खे भाऊ बूडत असताना, एक आदिवासी समाजाची ताई बाई उर्फ ताराबाई पवार हिने आपल्या जीवाची पर्वा न करता दोन युवकांना आपल्या अंगावरची साडी काढून जीवदान दिल्याची सत्य घटना की ज्या घटनेने चांगल्या चांगल्याचे डोळे भरून येत असून तिची आर्थिक परिस्थिती अतिशय बीकाटीची आहे. तिचा गुणगौरव सामाजिक दृष्ट्या करून आम्ही फुल नं फुलाची पाकळी आम्ही मदत करणारच आहोत, तसेच येत्या दोन-तीन दिवसात तिला एकलव्य सामाजिक संस्थेतून माता शबरी या पुरस्काराने सन्मानित देखील करणार आहोत परंतु, तसेच आर्थिक सहाय्य देखील फुल न फुलाची पाकळी देणार आहोत, परंतु या महिलेने जे कार्य केलेले आहे ते आयुष्यभर अविस्मरणीय बाब असून या गोष्टीची दखल तात्काळ मीडियाने घेतल्यामुळे स्थानिक राजकीय प्रशासकीय यंत्रणेला जाग आली असून तिचा सन्मान गौरव या गोष्टी सध्या तरी चालू असून ही आनंदाची बाब निश्चितच आहे, परंतु या शूरवीर महिलेचे राहते घर एकदा बघा , तिची परिस्थिती बघा, तिची अंगावरची साडी बघा, फक्त सन्मान आदर गुणगौरव करून अशा माणसाला न्याय भेटणार नाही तर अशा धैर्यशील रणरागिणीला स्थानिक आजी माजी आमदार, खासदार प्रशासकीय यंत्रणेने पाठपुरावा करून आर्थिक सहाय्य करून, तिला राहण्यासाठी योग्य घर उपलब्ध करून देणे गरजेचे वाटते आहे, तसेच अशा कर्तुत्वा न व धैर्यशील व्यक्तीला राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात यावा, फक्त भेट देऊन कौतुक करणे हे महत्त्वपूर्ण वाटत नाही, ताई बाई या आदिवासी महिलेचा कौतुक कोपरगाव तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रभर होत आहे, कारण गोदावरी नदी पात्रात बुडत असणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी स्वतःची जीवाची परवाना करणारी ताराबाई, इज्जतीची परवा न करणारी ताराबाई, मी या पोरांबरोबर गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू होऊ शकतो हे माहीत असतानाही या रणरागिनीने स्वतःच्या जीव धोक्यात घालून टांगतोडे घराण्यातील दोन युवकांना जीवदान दिले आहे म्हणजे संपूर्ण घर बसता बसता वाचवले आहे, आम्ही टांगतोडे यांच्या कुटुंबात दुःखात सहभागी आहोत! परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो! त्यांचे कुटुंब पुन्हा धैर्यशाली बनो हीच साईचरणी प्रार्थना


परंतु आजही स्वतःची जीवाची परवा न करणारी रणरागिणी ताई बाई पवार इला न्याय देण्यासाठी फक्त तिच सांत्वन करणे, सन्मान करणे, गुणगौरव करणे इथपर्यंतच विषय थांबत नाही तर अशा शूरवीर पराक्रमी महिलेला राहण्यासाठी घर, स्थानिक माजी आजी आमदारांनी शासकीय निधीतून अथवा आपल्या मार्फत आर्थिक सहाय्य करावे!व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने द्यावा ही अपेक्षा! अशा शूरवीर पराक्रमी मातेला प्रणाम व माझ्याकडून सतंनम दंडवत
आणि ही हिराकणी हिला उदंड आयुष्य लाभो हीच साईबाबा चरणी प्रार्थना!

मंगेश औताडे – संस्थापक अध्यक्ष एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *