


कोपरगाव प्रतिनिधी:-
सस्नेह जय महाराष्ट्र
सर्व क्रिकेट प्रेमी प्रेक्षकांच्या उपस्थितीत कोपरगाव ची क्रिकेट पंढरी लक्ष्मीआई मैदानावर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व कै.अँड दीपक अण्णा माळी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सरसेनापती चषक क्रिकेट स्पर्धा 2023 आयोजित केल्या गेल्या
रविवार दि.22/1/2023 रोजी सां.5वा अहमदनगर आर टी ओ सहाय्यक मोटार निरीक्षक कु.माधवी वाघ यांच्या अध्यक्षतेखाली , ठोळे उद्योग समूह व जेष्ठ नागरिक मंच यांच्या वतीने सौ सुधाभाभी ठोळे,प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ राजेश माळी, माजी नगरसेवक कालुअप्पा आव्हाड,श्री कैलास मंजूळ शिवसेना संपर्क प्रमुख श्री प्रवीण शिंदे,प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री प्रसाद नाईक,म न से उपजिल्हा प्रमुख श्री संतोष गंगवाल,श्री योगेश गंगवाल ,श्री अनिल गायकवाड,श्री विजय बंब,राखीताई विसपुते यांच्या प्रमुख उपस्थित पारितोषिक वितरण समारंभ पार पडला कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष श्री मकरंद कोऱ्हाळकर व उपाध्यक्ष श्री प्रसाद नाईक यांनी प्रास्ताविक केले आर टी ओ अधिकारी श्रीमती माधवी वाघ यांनी अध्यक्षीय मनोगत मांडले व मुंबादेवी तरूण मंडळाचे अध्यक्ष श्री सुनील फंड यांनी आभार मानले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साकोली शिवसेना संपर्क प्रमुख व क्रिकेट असोसिएशन चे सचिव श्री मनोज कपोते यांनी विशेष परिश्रम घेतले स्कोरर म्हणून श्री पप्पू गंगवाल, श्री उमेश मोरे श्री महेश आमले बिनचूक पणे कार्य केले तर श्री ओम कपोते,समर्थ दीक्षित, गौरव सोनार,ओंकार भागवत, गणेश आमले, साईराज विसपुते, संजय रीळ, वेदांत राठी प्रतिक गंगवाल यांनी परिश्रम केले श्री राजेंद्र माळी,श्री राजेश खंडागळे,श्री संजय जगताप, सुनील खैरे,श्री संदीप दळवी,श्री भानुदास लोणारी श्री मनोज विसपुते हे उपस्थित होते .



अंतिम सामन्यात प्रसिद्ध समालोचक श्री शरद होन यांनी रसभरीत वर्णन केले तर पंच म्हणून श्री पवन शिंदे व राजेंद्र होन यांनी काम पाहिले हे होते प्रथम पारितोषिक 21000 रुपये व चषक रायगड इलेव्हन येवला यांनी ,द्वितीय पारितोषिक 11000 व चषक श्री छत्रपती अ संघ कोपरगाव, तृतीय पारितोषिक रुपये 7000 व चषक टिळक चौक कोपरगाव, चतुर्थ पारितोषिक रुपये 5000 व चषक श्री छत्रपती c कोपरगाव यांनी मिळवले मॅन ऑफ द मॅच संजय वाबळे व मॅन ऑफ द सिरीज श्री फरहान येवला हे ठरले
आपले नम्र
कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन
मुंबादेवी तरुण मंडळ ,
शिवसेना शाखा छत्रपती चौक ,कोपरगाव
