पक्षाच्या सीमा ओलांडून कोपरगावात गुरु शिष्यांची अनोखी गुरुपौर्णिमा साजरी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
गुरुपौर्णिमा उत्सव देशभरात मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जात आहे. हिंदू धर्मात आणि बौद्ध धर्मात गुरुपौर्णिमाला  मोठे महत्व  आहे .गुरुपौर्णिमा आपल्या गुरु प्रति प्रेम प्रकट करण्याचं माध्यम म्हणजे गुरुपौर्णिमा होय .या गुरुपौर्णिमा निमित्ताने अनेक शिष्य आपल्या गुरूंची सेवा करत असतात. कोपरगावात असाच एक गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला असून त्याची कोपरगाव शहरात चर्चा सुरू आहे .राजकीय क्षेत्रामध्ये अनेकांचे गुरु असतात त्यामुळेच तर राजकीय क्षेत्रामध्ये अनेक शिष्य भरारी घेत असतात. असाच एक गुरु शिष्यांचा कोपरगाव मध्ये उत्सव आपणास पहावयास मिळत आहे.पक्षाच्या सीमा ओलांडून गुरु शिष्यांची अनोखी गुरुपौर्णिमा  कोपरगावात साजरी  झाली . वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव गौतम बनसोडे हे पूर्वीपासूनच संदीप रावजी वर्पे यांना आपले गुरु मानत आलेले आहे .संदीपराव वर्पे जरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाचे असले तरी पक्षाच्या सीमा ओलांडून या दोघांनी गुरुपौर्णिमा साजरी केली अशा प्रकारच्या अनोखे नाते कमी बघायला मिळते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *